एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उस्मानाबादमध्ये कंटेनरची बैलगाडीला धडक, पाच जणांचा मृत्यू
उस्मानाबाद : उस्मानाबादमधील ढोकी गावात लातूर महामार्गावर एका कंटेनरने बैलगाडीला धडक दिली. या घटनेत पाच जणांसह एक शेळी, दोन बैलांचा मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने कंटेनर पेटवून दिला.
मृतांमध्ये राजाभाऊ काळे, याकूब पठाण, मशिरा खैरातअली सय्यद, मुनी समीरखाँ पठाण, उमेर ईफ्तेखार पटेल यांचा समावेश आहे.
दरम्यान जखमींना सरकारी रुग्णालयात नेल्यानंतर तिथे कर्मचारीच उपस्थित नसल्याने संतप्त जमावाने रुग्णालयाचीही तोडफोड केली. त्यामुळे परिसरात काही काळासाठी तणावाचं वातावरण होतं. कंटेनर चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement