एक्स्प्लोर

 Atul Londhe on BJP : महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे कारस्थान? राम कदमांचा आरोप, काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर

धुळ्यात सापडलेल्या तलवारींच्या मुद्यावरुन काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. काँग्रेशासित राज्यातून या तलवारी आल्या असल्याचा आरोप आमदार राम कदम यांनी केला आहे.

 Atul Londhe on BJP : धुळ्यामध्ये सापडलेल्या 90 तलवारींच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार राम कदम यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेशासित राज्यातून या तलवारी आल्या असल्याचा आरोप राम कदम यांनी केल आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, त्या ठिकाणाहून या तलवारी धुळ्यामध्ये जात होत्या असे कदम म्हणाले. महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे कारस्थान कोण रचतयं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मात्र, त्यांच्या या आरोपावर काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

दंगलीचा फायदा नेमका कोणाला होतो? असा उलटा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. तुम्ही तलवारीवर बोलता पण गुजरातमधून आलेल्या ड्रग्जवर का बोलत नाही. भाजपच्या राज्यातून ड्रग्ज मोठ्या प्रमाणावर येत आहे, त्यावर काय कारवाई केली ते सांगा? असा सवालही लोंढे यांनी राम कदम यांना केला.

भाजपचे नेते नेहमी दोन समुदायमध्ये भांडण व्हावे अशीच वक्तव्ये करत असल्याचे लोंढे म्हणाले. भाजपच्या नेत्यांनी शांत राहिले तर सगळा देश शांत होईल असे ते म्हणाले. उत्तर प्रदेशच्या लखनौ विद्याविपाठात 50 विद्यार्थी बॉम्ब बनवताना पकडले गेले.  ते अल्पसंख्याक असते तर बवाल झाला असता, मात्र ती बातमी दाबली गेली. त्याबाबत काय करणार आहेत असा सवालही लोंढे यांनी उपस्थितीत केला. दरम्यान, ज्या तलवारी सापडल्या त्याबाबत राज्य सरकार चौकशी करणार आहे.  गृहमंत्रालय याच्या तळाशी जाणार असल्याचे लोंढे म्हणाले. जे कोणी महाराष्ट्राचे वातावरण दुषीत करण्याचा प्रयत्न करणार त्याच्यावर कारवाई होईल असेही लोंढे यांनी सांगतिले. दरम्यान, महाराष्ट्रात जे ड्रग्ज येत आहे, त्याच्यावरही बंधन टाकले पाहिजे असे लोंढे म्हणाले. भाजप राज्यातील जनतेला नशेली करण्याचे काम करत असल्याचा आरोप लोंढे यांनी केला.
 
महाराष्ट्रात काय घडते ते बघा. युपीत काय चालले हे महाराष्ट्राच्या जनतेचा प्रश्न आहे का?  या तलावारी राजस्थानमधूनच का येतात? इकडे तिकडे बोटे का दाखवता, बोटे दाखवू नका जबाबदारी घ्या, असेही राम कदम यावेळी म्हणाले.

प्रकरण काय

धुळ्यातील सोनगीर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पेट्रोलिंग करताना एका गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीत 90 तलवारी आढळून आल्या. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत पोलिसांनी 7 लाख 13 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमालही जप्त केला आहे. सोनगीर पोलीस हे पेट्रोलिंग करत असताना शिरपूरकडून धुळेच्या दिशेने एक भरधाव स्कॉर्पिओ कार येत होती. पोलिसांनी कारला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु चालकाने गाडी न थांबवता आणखी जोराने पळवली. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी पाठलाग करुन संबंधित गाडी थांबवून विचारणा केली. यावेळी गाडीत असलेल्या चार जणांची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे 90 तलवारी आढळून आल्या. सोनगीर पोलिसांनी तात्काळ चारही आरोपींना तलवारींच्या सोबत ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget