एक्स्प्लोर

'शकुनी काकांचा दोन हजार कोटीची एसटी बँक अन् मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव', पडळकरांचे शरद पवारांवर गंभीर आरोप

आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एसटी बँक निवडणुकीवरुन गंभीर आरोप केला आहे

Gopichand Padalkar Allegation On Sharad Pawar : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एसटी बँक निवडणुकीवरुन गंभीर आरोप केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटलं आहे की, मागील सहा महिन्यापासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे, असं पडळकरांनी म्हटलं आहे.

पडळकर यांनी म्हटलं आहे की, एसटी बँकेची निवडणूक घोषीत केली आहे आणि जे सदस्य थकबाकीदार आहेत त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा फतवा काढला आहे. सहाजिकच जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते  तेच थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही.

'सभासद फीस नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रूपये वसूल केले'

गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे की, 1995 ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वत:च्याच एकमेव संघटनेला मान्यता प्राप्त करून दिली आणि सभासद फीस नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रूपये वसूल केले. त्या व्यतिरिक्त अधिवेशनाखाली 500 रूपये व वाढदिवसानिमित्त मनसोक्त रक्कम गोळा केली. अशा वेगवेगळ्या मार्गानं जवळपास 100 कोटी रूपये गिळंकृत केले.  त्यातूनच  वर्षाआड आपल्याच बगलबच्च्यांना 20-20 लाखांच्या आलीशान गाड्या खरेदी करून दिल्या, असा आरोप देखील पडळकर यांनी केला आहे. 

'मोघलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार' 

पडळकरांनी म्हटलं आहे की, ज्यावेळेस एसटी कामगार व त्यांचा परिवार उपाशी पोटी उघड्यावरती लढा देत होतो.  त्यावेळेस या संघटेनेचे सर्वेसर्वा यांनी माणुसकीखातीर आपल्या सिल्वर ओकवरून एक वेळचं जेवण तर सोडा पण साधं चहापाणी सुद्धा पाठवलं नाही.  जरा तरी यांच्यात माणुसकी शिल्लक असती तर यांनी त्या 135 विधवा भगिनींना आर्थिक मदत दिली असती.  अशा मोघलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार आहोत व कायदेशीररित्या यांचा डाव उधळून लावणार आहोत, असा इशारा देखील पडळकर यांनी दिला आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravikant Tupkar : बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीचं निमंत्रण दिलं : तुपकरSpecial Report Maharashtra Politics | 11 कोटींच बक्षीस, विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर 'बोलंदाजी'Special Report Ravindra Waikar | आरोप चुकले, वायकर सुटले? क्लीनचीटवरून विरोधकांचा हल्लाबोलPune Politce Attack :पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न,  पुण्यात वर्दीवरच हल्ला, सामान्याचं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
Embed widget