Nashik : भोंग्याबाबत माजी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांचे आदेश नाशिकच्या नव्या पोलिस आयुक्तांकडून रद्द
Nashik Bhonga : माजी पोलिस आयुक्त दिपक पांडेय (Deepak Pandey) यांचा भोंग्याबाबतचा मनाई आदेश नवे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) यांनी केला रद्द आहे.
Nashik Bhonga News Updates : नाशिकचे माजी पोलिस आयुक्त दिपक पांडेय (Deepak Pandey) यांचा भोंग्याबाबतचा मनाई आदेश नवे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) यांनी केला रद्द आहे. भोंग्याबाबत शहरातील (Nashik Bhonga Issue) सर्व परिस्थिती विचारात घेता स्वतंत्र आदेशाची गरज नसल्याचं नव्या पोलिस आयुक्तांच मत आहे. भोंग्याबाबत महाराष्ट्र शासन जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचं पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांचं मत आहे. 17 एप्रिलला दीपक पांडेय यांनी भोंग्याबाबत मनाई आदेश जारी केला होता.
दीपक पांडेय यांचे काय होते आदेश -
- 3 मे पर्यंत मशिदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार होती नाहीतर 3 मे नंतर कारवाईला सामोरे जावे लागणार होते
- कोणाला हनुमान चालीसा लावायची असल्यास देखील पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक होती
- अजानवेळी मशिदीच्या 100 मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी नाही