एक्स्प्लोर
विरोधकांचा मोगली झालाय, मुख्यमंत्र्यांचा टोला
नागपूर : सरकार डोरेमॉन आणि जनता म्हणजे नोबिता, असे म्हणणाऱ्या विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांना मुख्यमंत्र्यांनी त्याच शब्दात उत्तर दिलं आहे. "नगरपालिका निवडणुकीत 'हर जगह फूल खिला है' म्हणून त्यांचा 'मोगली' झाला आहे." असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
नागपुरात उद्यापासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होतं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली.
विरोधकांचा मोगली झाला आहे - मुख्यमंत्री
सरकार म्हणजे डोरेमॉन-नोबिताचं कार्टून झालं आहे. ज्याप्रमाणे डोरेमॉन नोबिताला वास्तवापासून दूर नेतं आणि स्वप्न दाखवतं त्याप्रमाणे हे सरकार करत असल्याचा घणाघात विखे पाटलांनी केला होता. विखे पाटलांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "नगरपालिका निवडणुकीत हर जगह फूल खिला है इसलिए उनका मोगली बन गया है"
विरोधक अजूनही प्रगल्भ नाहीत - मुख्यमंत्री
"विरोधीपक्ष गंभीरपणे भूमिका मांडतील, असं वाटलं होतं. मात्र, दुर्दैवाने विरोधक अजूनही प्रगल्भ नाहीत. विरोधक कार्टून, डोरेमॉन, पोकेमॉनमध्येच अडकले आहेत." अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली.
मराठा मोर्चांवर मुख्यमंत्री काय म्हणाले?
मराठा मोर्चा, आरक्षण याबाबतीत अधिवेशनात गंभीरपणे रोडमॅप बनवला जाईल, अशी अपेक्षा करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मराठा मोर्चाचे निवेदन घेणार का, या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "मंत्र्यांनी निवेदन घेऊ नये, ही भूमिका मराठा मोर्चाने बदलली तर निवदेन घेण्याबाबत विचार करु." शिवाय, दलित, ओबीसी समाजात कोणतीही चिंता राहू नये, याची काळजी सभागृह घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नोटाबंदीवर मुख्यमंत्री काय म्हणाले?
नोटाबंदीनंतरही बाजार समित्यांचे व्यवहार सुरळीत सुरु आहेत, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, "85 टक्के चलन बदलणार असल्याने त्रास होणारच. मात्र, सर्वसामान्य जनतेचे आभार, कारण नोटाबंदीचा निर्णय देशहिताचा असल्याने त्रास सहन केला."
यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या नोटाबंदीवरील भूमिकेवरही वक्तव्य केलं. "शिवसेनेचा नोटाबंदीला विरोध नाही, उद्भवलेल्या त्रासाला आहे.", असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
- जनतेला न्याय देण्यासाठी सरकार सज्ज - मुख्यमंत्री
- बाजार समितींचे व्यवहार व्यवस्थित सुरु - मुख्यमंत्री
- विरोधक गंभीरपणे भूमिका मांडतील, असं वाटलं होतं, पण विरोधक अजून प्रगल्भ नाहीत - मुख्यमंत्री
- राज्यात रब्बीची पेरणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे - मुख्यमंत्री
- सर्वसामान्य जनतेचे आभार, कारण नोटाबंदीचा निर्णय देशहिताचा असल्याने त्रास सहन केला - मुख्यमंत्री
- दलित, ओबीसी समाजात कोणतीही चिंता राहू नये, याची काळजी सभागृह घेईल - मुख्यमंत्री
- राज्याला पुढे नेण्यासाठी विरोधीपक्षांनीही सहकार्य करावं - मुख्यमंत्री
- मराठा आरक्षणासंदर्भात एक निश्चित रोडमॅप करु - मुख्यमंत्री
- विरोधकांचा मोगली झाला आहे - मुख्यमंत्री
- नगरपालिका निवडणुकीत 'हर जगह फूल खिला है' म्हणून त्यांचा 'मोगली' झाला आहे - मुख्यमंत्री
- शिवसेनेचा नोटाबंदीला विरोध नाही, उद्भवलेल्या त्रासाला विरोध - मुख्यमंत्री
संबंधित बातम्या :
सरकार म्हणजे डोरेमॉन, जनता म्हणजे नोबिता : विखे पाटील
नौ लाख के हार के लिए बारा लाख के आँसू, नोटाबंदीवर धनंजय मुंडेंची टीका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement