एक्स्प्लोर
पावसात भिजण्याचा आमचा अनुभव कमी पडला, मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पावसात भिजावं लागतं, त्यामध्ये आमचा अनुभव कमी पडला, असे वक्तव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे.
मुंबई : निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पावसात भिजावं लागतं, त्यामध्ये आमचा अनुभव कमी पडला, असे वक्तव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. ऑफ कॅमेरा माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी पवारांवर टीका केली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी विरोधकांची भूमिका चोख बजावत असताना सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. राजव्यापी दौरे करुन मागील विधानसभेपेक्षा जास्त आमदार निवडून आणले. यादरम्यान पवारांचं एक पावसातलं भाषण तुफान गाजलं होतं. मुख्यमंत्र्यांनी याच भाषणावरुन शरद पवारांना लक्ष्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीपूर्वी साताऱ्यात एक वादळी सभा घेतली होती. या सभेवेळी भरपावसात शरद पवार यांनी आपलं भाषण केलं. आभाळातून पाऊस बरसत असताना शरद पवार सत्ताधाऱ्यांवर बरसत होते. या भाषणानंतर शरद पवारांचं देशभरात कौतुक झालं.
त्याचीच प्रचिती म्हणून सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. तसेच विधानसभेत राष्ट्रवादीच्या जागा 41 वरुन 56 वर पोहोचल्या आहेत.
शरद पवारांनी ते भाषण लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी केलं होतं, असा अप्रत्यक्ष टोला फडणवीस यांनी लगावला आहे. फडणवीस म्हणाले की, प्रचारादरम्यान पावसात भिजण्याचा आमचा अनुभव कमी पडला.
शरद पवारांचं ते वादळी भाषण पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement