एक्स्प्लोर
Advertisement
शिक्षण हक्क कायद्यात बदल, नापासांची दोन महिन्यात फेरपरीक्षा
जो विद्यार्थी इयत्ता पाचवी किंवा आठवीमध्ये नापास होईल त्यांची दोन महिन्यात फेरपरीक्षा घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात पुढील शिक्षणासाठी सामील केलं जाणार आहे.
मुंबई : केंद्र सरकारकडून शिक्षण हक्क कायदा-2009 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार देशात प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाचा अधिकार आहे. या अधिकारामध्ये केंद्र सरकारकडून आता इयत्ता पाचवी आणि आठवी साठी जे विद्यार्थी नापास होतील त्यांची फेरपरीक्षा घेणेबाबतची नवी तरतूद करण्यात आली आहे.
जो विद्यार्थी इयत्ता पाचवी किंवा आठवीमध्ये नापास होईल त्यांची दोन महिन्यात फेरपरीक्षा घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात पुढील शिक्षणासाठी सामील केलं जाणार आहे.
याआधी इयत्ता पहिली ते आठवीमध्ये विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता इयत्ता पहिली ते चौथी मध्ये विद्यार्थ्यांना नापास न करता पुढील वर्गासाठी त्याचा अभ्यास करुन त्याला तयार केलं जाणार आहे. तर पाचवी आणि आठवी इयत्तेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा घेऊन पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बॉलीवूड
निवडणूक
भारत
Advertisement