एक्स्प्लोर
डेव्हलपर्समुळे डास, ठाण्यात 98 विकासकांवर गुन्हे !
ठाणे : साथीचे आजार पसरल्यामुळे ठाणे महापालिकेने तब्बल 98 विकासकांवर गुन्हे दाखल केले आहेत. महापालिकेने थेट साथीच्या आजारांमुळे अशाप्रकारची कारवाई केल्याने, ठाणे परिसरात खळबळ उडाली आहे.
डास उत्पत्ती होईल अशी परिस्थिती निर्माण केल्याचा ठपका विकासक/डेव्हलपर्सवर ठेवण्यात आला आहे.
डेंग्यू, मलेरियाच्या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात, तर हत्तीरोगाच्या डासांची उत्पत्ती घाण पाण्यात, गटारी, नाल्यात होते. डबक्यांमध्ये साठलेल्या पाण्यामुळे डासांची निर्मिती होऊन, ते आजाराला कारणीभूत ठरतात. त्यामुळे अशी डबकी, नाले तयार होण्यासाठी विकासकच जबाबदार आहेत, असं ठाणे मनपाचं म्हणणं आहे. त्यामुळेच या 98 विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरात सुरु असलेल्या बांधकामाच्या परिसरात, खड्ड्यात साठलेल्या पाण्याचा निचरा न केल्याने, साथीच्या रोगाचा फैलाव होत असल्याचा दावा महापाालिकेचा आहे.
सध्या ठाणे महापालिका परिसरात काविळीची साथ पसरल्याचं चित्र आहे. सहा महिन्यात काविळीचे 61 रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णसंख्येतही सातत्याने वाढ होत आहे.
त्यामुळे ठाणे मनपाने यासाठी विकासकांवर ठपका ठेवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement