एक्स्प्लोर
नवविवाहितेचे अश्लिल फोटो, पतीच्या चुलत भावांकडूनच ब्लॅकमेल
वाशिम: नवविवाहित महिलेचे अश्लील फोटो काढून चार लाखांची खंडणी मागितल्याची घटना वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीरमध्ये घडली आहे.धक्कादायक बाब म्हणजे, ही खंडणी मागणारे पीडित महिलेच्या पतीचे चुलत भाऊ असल्याचं समोर आलं आहे.
खंडणीखोरांनी दसऱ्याच्या दिवशी पीडित महिलेच्या पतीला फोन करुन त्यांच्या पत्नीचे अश्लिल फोटो व्हॉट्सअॅप आणि इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली. तसेच यासाठी एक लाखाची खंडणी मागितली. खंडणी मागणाऱ्यांना भेटायला गेले असता, खंडणी मागणाऱ्या व्यक्तींबरोबर पीडित महिलेच्या पतीचे चुलत भाऊ सुद्धा होते.
त्यानंतर तिन्ही आरोपींनी तब्बल 4 लाखांची मागणी केली आणि पोलिसात तक्रार न देण्याची धमकीही दिली.
अखेर घाबरलेल्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतल्यानंतर तीन दिवसांनंतर देवेंद्र ठाकूर, सुनिल चव्हाण आणि संदीप चव्हाणवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप तिघांना अटक झालेली नाही.
दरम्यान, या प्रकरणी अजूनही कुटंबीयांना धमक्या येत असून पीडित कुटुंब दहशतीखाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement