Breaking News LIVE : संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधींची भेट
Breaking News LIVE Updates, 2 August 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
LIVE
Background
"मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्वसन महत्वकांक्षी प्रकल्प, अभिमान वाटेल अशा पद्धतीने तयार होईल. त्यातील रहिवाशांचं व्यवस्थितरित्या पुनर्वसन करु. मुंबईतील वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पातून रहिवाशांच्या चांगल्या घराची स्वप्नं, आशा पूर्ण होणार आहे. महाविकास आघाडी सरकार याबाबत कटिबद्ध आहे. मुंबईतील प्रत्येक चाळवासियाला इथं रहावंस वाटेल, अशा पद्धतीनं वरळी बीडीडी चाळीचं पुनर्वसन होईल.", अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं कौतुक केलं. अजित पवार त्यांच्या इतर कामामुळे कार्यक्रमस्थळी पोहचू शकले नाहीत. मात्र त्यांनी विडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
अश्वगंधाच्या औषधावर आता ब्रिटनमध्ये संशोधन होणार, आयुष मंत्रालयाचा यूकेच्या LSHTM सोबत करार
अश्वगंधा या वनस्तपीपासून तयार केलेल्या औषधामुळे कोविड रुग्णांना फायदा होत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आयुष मंत्रालयाने यूकेच्या लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनसोबत (LSHTM) 'अश्वगंधा'वर अभ्यास करण्यासाठी करार केला आहे.
मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) आणि LSHTM ने अलीकडेच यूकेच्या तीन शहरांमध्ये 2,000 लोकांवर 'अश्वगंधा' च्या क्लिनिकल चाचण्या करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
'भारतीय हिवाळी चेरी'
'अश्वगंधा' (Withania somnifera), ज्याला सामान्यतः 'इंडियन विंटर चेरी' म्हणून ओळखले जाते, ही एक पारंपरिक भारतीय औषधी वनस्पती आहे, जी ऊर्जा वाढवते, तणाव कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. अश्वगंधा सहज उपलब्ध होणारी असून ओव्हर-द-काउंटर पोषण पूरक आहे. लाँग कोविडमध्ये 'अश्वगंधा' चे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. औषधाची चाचणी यशस्वी झाल्यास मोठं यश मिळणार आहे. यामुळे भारताच्या पारंपारिक औषधी प्रणालीला वैज्ञानिक वैधता मिळू शकेल.
वेदिकाची मृत्यूची झुंज अपयशी, 16 कोटींच्या इंजेक्शनंतरही वेदिकाचा उपचारादरम्यान मृत्यू
पिंपरी चिंचवडच्या वेदिका शिंदे या चिमुरडीची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. वेदिकाला स्पायनल मस्कुलर ऍट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला होता. यासाठी तिला तब्बल 16 कोटी रुपयांची झोलगेन्स्मा ही लस देण्यात आली होती. यासाठी आई-वडिलांनी लोकासहभागासाठी आवाहन केलं होतं, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. म्हणूनच देश-विदेशातील अनेक दात्यांनी हातभार लावला होता. या सर्वांच्या प्रयत्नाने अमेरिकेतून झोलगेन्स्मा लस आयात करण्यात यश आलं होतं. 15 जूनला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिला ही लस देण्यात आली. आता ती ठणठणीत बरी होईल अशीच अख्ख्या देशाला अपेक्षा होती. पण रविवारी मात्र ही दुःखद बातमी आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीये.
फेब्रुवारी महिन्यात वेदिकाच्या शरीरातील हालचाली या नैसर्गिकरित्या होत नसल्याचं दिसून आलं होतं. म्हणून तिच्या आई-वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, तेव्हा या लहान चिमुरडीला दीर्घायुष्य हवं असेल तर तब्बल 16 कोटी रुपयांची लस द्यावी लागणार असल्याचं समजलं. कारण ह्या आजारामध्ये खूप जलद गतीने बाळाच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. शिवाय जसजसे हे प्रमाण वाढत जाते तसतसे रुग्णाला श्वास घेणे, चालणे, शरीराची हालचाल करणे, मान धरणे या सगळ्या क्रिया करताना त्रास व्हायला सुरुवात होते आणि वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर शरीरातील सगळे भाग निकामी होऊन रुग्ण दगावतो.
संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधींची भेट
संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधींची भेट, महाविकास आघाडीमधील कुरबुरीची चर्चा सुरू असताना महत्वाची भेट, 12 तुगलक लेन या राहुल गांधींच्या निवासस्थानी संजय राऊत-राहुल गांधींमध्ये सव्वा तास बैठक, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संजय राऊत आणि राहुल गांधी यांची पहिलीच वन-टू-वन बैठक
संजय राऊत यांनी घेतली राहुल गांधींची भेट
महाविकासआघाडी मधल्या कुरबुरीची चर्चा सुरू असताना महत्वाची भेट घेतली. 12 तुगलक लेन या राहुल गांधींच्या निवासस्थानी संजय राऊत-राहुल गांधी मध्ये सव्वा तास बैठक सुरू होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संजय राऊत आणि राहुल गांधी यांची पहिलीच वन-टू-वन बैठक सुरू आहे.
गणेशोत्सवानिमित्त पुणे महापालिकेने काढली मार्गदर्शक नियमावली
गणेशोत्सवानिमित्त पुणे महापालिकेने काढली मार्गदर्शक नियमावली
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही गणेशोत्सव साधेपणाने होणार साजरा...
- सार्वजनिक मंडळात चार फूट तर घरात दोन फूट गणेश मूर्ती बसवण्यास परवानगी...
- श्रीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला पूर्णपणे बंदी...
- शासनाने दिलेल्या मर्यादेतच गणेश मंडप उभा करावे...
- गणेशोत्सवात शासन कोरोना प्रतिबंधित नियमात कुठेही शिथिलता देणार नाही...
- सार्वजनिक मंडळानी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करावी
राज्य सरकारची नवी नियमावली जारी, सोमवार ते शनिवार दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार
राज्य सरकारची नवी नियमावली जारी, 25 जिल्ह्यांना दिलासा, सोमवार ते शनिवार दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार, 4 ऑगस्टपासून नियम लागू
बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, उद्या दुपारी 4 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार
बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, उद्या दुपारी 4 वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार