एक्स्प्लोर
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Guillain-Barré Syndrome outbreak : रुग्णांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या आजाराची भीती बाळगू नये तसेच अफवा पसरू नये, असे आवाहन करण्यात आलं आहे.

Guillain-Barré Syndrome outbreak
Source : PTI
Guillain-Barré Syndrome outbreak : पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगलीनंतर आता साताऱ्यात सुद्धा जीबीएसचा शिरकाव झाला आहे. सातारसह कराडमध्येही रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच जीबीएसचे चार रुग्ण आढळून आले आहेत. यामधील एक रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे तर दोन रुग्ण साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर एक रुग्ण कराडमध्ये उपचार घेत आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. नागरिकांनी या आजाराची भीती बाळगू नये तसेच अफवा पसरू नये. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी केले आहे..
बीएस आजारामुळे आणखी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला
दुसरीकडे, जीबीएस महाराष्ट्रात सर्वदूर होत चालला आहे. या जीबीएस आजारामुळे आणखी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर या संशयित आजाराने मृतांची संख्या दोन झाली आहे. बुधवारी (29 जानेवारी) येथे जीबीएसची 16 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, 29 जानेवारीपर्यंत GBS च्या 127 संशयित रुग्णांची ओळख पटली आहे, ज्यात 2 संशयित मृत्यूंचा समावेश आहे. यापैकी 72 रुग्णांमध्ये जीबीएसची पुष्टी झाली आहे. 23 रुग्ण पुणे महानगरपालिकेतील, 73 रुग्ण पीएमसी क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील, 13 पिंपरी चिंचवड महापालिकेतील, 9 पुणे ग्रामीण आणि 9 रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. बाधितांपैकी 20 जण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
जीबीएसची लक्षणे दिसू लागल्यास घाबरू नका आणि वेळेवर उपचार करता यावेत यासाठी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन महाराष्ट्र सरकारने मंगळवारी केले. अशी लक्षणे दिसल्यास उपचारात दुर्लक्ष करू नका. त्याचबरोबर या आजाराची लक्षणे दिसल्यास प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्याचा सल्लाही सरकारने दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारीही अनेक ठिकाणी जीबीएसचे रुग्ण दिसले. यापैकी सात रुग्ण पुणे महापालिकेतील, एक रुग्ण पिंपरी चिंचवड महापालिकेचा आणि एक रुग्ण दुसऱ्या जिल्ह्यातील आहे.
आतापर्यंत, एकूण 127 संशयित GBS रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 मरण पावले आहेत. हे पाहता लोकांमध्ये अनेक प्रकारची चिंता निर्माण होत आहे, मात्र अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन सरकार सातत्याने करत आहे. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आतापर्यंत, एकूण 127 संशयित GBS रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 2 मरण पावले आहेत. हे पाहता लोकांमध्ये अनेक प्रकारची चिंता निर्माण होत आहे, मात्र अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन सरकार सातत्याने करत आहे. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
