(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अश्वगंधाच्या औषधावर आता ब्रिटनमध्ये संशोधन होणार, आयुष मंत्रालयाचा यूकेच्या LSHTM सोबत करार
अश्वगंधाच्या औषधावर आता ब्रिटनमध्ये संशोधन होणार, आयुष मंत्रालयाचा यूकेच्या लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनसोबत सोबत करार केला आहे.
अश्वगंधा या वनस्तपीपासून तयार केलेल्या औषधामुळे कोविड रुग्णांना फायदा होत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आयुष मंत्रालयाने यूकेच्या लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनसोबत (LSHTM) 'अश्वगंधा'वर अभ्यास करण्यासाठी करार केला आहे.
मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) आणि LSHTM ने अलीकडेच यूकेच्या तीन शहरांमध्ये 2,000 लोकांवर 'अश्वगंधा' च्या क्लिनिकल चाचण्या करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
'भारतीय हिवाळी चेरी'
'अश्वगंधा' (Withania somnifera), ज्याला सामान्यतः 'इंडियन विंटर चेरी' म्हणून ओळखले जाते, ही एक पारंपरिक भारतीय औषधी वनस्पती आहे, जी ऊर्जा वाढवते, तणाव कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. अश्वगंधा सहज उपलब्ध होणारी असून ओव्हर-द-काउंटर पोषण पूरक आहे. लाँग कोविडमध्ये 'अश्वगंधा' चे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. औषधाची चाचणी यशस्वी झाल्यास मोठं यश मिळणार आहे. यामुळे भारताच्या पारंपारिक औषधी प्रणालीला वैज्ञानिक वैधता मिळू शकेल.
"अश्वगंधा"वर विविध आजारांमध्ये त्याचे फायदे समजून घेण्यासाठी अनेक अभ्यास झाले असले तरी, आयुष मंत्रालयाने कोविड -19 रुग्णांवर त्याच्या प्रभावीतेची तपासणी करण्यासाठी परदेशी संस्थेशी सहकार्य करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे.
एआयआयएच्या संचालिका तनुजा मनोज नेसारी म्हणाल्या, की येत्या 90 दिवसांत ब्रिटनमध्ये लिसेस्टर, बर्मिंगहॅम आणि लंडनमध्ये अशा दोन हजार रुग्णांवर एक हजारांचा याप्रमाणे दोन गटांत हा अभ्यास केला जाईल. नंतर 90 दिवस तुलानात्मक अभ्यास होणार आहे. डॉ. नेसारी म्हणाल्या की भारतात अश्वगंधाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. कोविडची दिर्घकालीन लक्षणे कमी करण्यात चांगला परिणाम होत असल्याने कोविड उपचारात हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )