एक्स्प्लोर
Advertisement
मतदान करा, फोटो पाठवा
मुंबई : मतदारराजासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस अखेर येऊन ठेपला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिका आणि 11 जिल्हा परिषदांतील दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज होणार आहे.
निवडणूक आयोगासह पोलिस, प्रशासन आणि राजकीय पक्षही सज्ज झाले आहेत. 23 तारखेला महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या दोन्ही टप्प्यांची मतमोजणी होणार आहे.
आज साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. संध्याकाळी साडेपाचपर्यंत जितके मतदार रांगेत उभे राहतील त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
भारतीय राज्यघटनेनं लोकशाहीच्या माध्यमातून दिलेला आपला मतदानाचा हक्क बजावणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे.
यंदाचा हा मतदानाचा महत्वपूर्ण क्षण आपल्या सर्वाच्या आठवणीत राहावा यासाठी आम्ही आपल्यासाठी एक खास संधी घेवून येत आहोत. लोकशाहीची जोपासणा करत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या प्रत्येकाला प्रोत्साहन द्यावं, त्यांच्या प्रयत्नांना साद घालावी यासाठी एबीपी माझा आणि एबीपी न्यूज आपल्या वाचक आणि प्रेक्षकांचे मतदानाचे फोटो दाखवणार आहे.
याचाच भाग म्हणून तुम्ही मतदान केल्यानंतर ज्या बोटावर शाई लावली जाते त्या बोटासह तुमचा फोटो काढून आम्हाला पाठवा. तुमचा हा फोटो आम्ही आमची वेबसाईट www.abpmajha.in, वर प्रसिद्ध करणार आहोत.
त्यामुळं तुम्हालाही तुमचं छायाचित्र जर माझाच्या वेबसाईटवर पाहायचे असतील तर शाई लावलेल्या बोटासह तुमचा फोटो काढा आणि आम्हाला पाठवून द्या...
तुम्ही तीन पद्धतींनी आम्हाला तुमचं छायाचित्र पाठवू शकतात :
1) आम्हाला तुमचा फोटो थेट ईमेल करा-
majhaphoto@gmail.com वर
2) एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर तुमचं छायाचित्र #माझंमतमाझाफोटो लिहून अपलोड करा www.facebook.com/abpmajhatv या पेजवर
3) एबीपी माझाच्या ट्विटर हँडल https://twitter.com/abpmajhatv यावर #माझंमतमाझाफोटो या हॅशटॅगसह तुमचे फोटो ट्विट करा.
मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती आणि आवाहन करण्यासाठी एबीपी माझा ही विशेष मोहिम राबवत आहे. त्यामुळं मतदानाचा हक्क पूर्ण बजावा आणि तुमचा फोटो आम्हाला पाठवा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement