एक्स्प्लोर

एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून करोडोंच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा अनिल परबांचा डाव : आमदार गोपीचंद पडळकर 

करोडोंच्या जमिनींची विल्हेवाट लावण्याचा अनिल परबांचा डाव दिसतोय, असा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पहिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केला आहे.

ST Workers Protest Anil Parab मुंबई : ज्या पद्धतीने मुंबईतील मील कामगारांचा संप चिघळवला व शेवटी अनिर्णयीत परिस्थितीत आणून ठेवला. नंतर मील मालकांसोबत मिलीभगत करत जमिनी विकून करोडोंची टक्केवारी गोळा केली होती. अगदी त्याच हेतूने एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळवून विविध शहरातील करोडोंच्या जमिनींची विल्हेवाट लावण्याचा अनिल परबांचा (anil parab) डाव दिसतोय, असा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी पहिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर केला आहे.

"पहिवहन मंत्री अनिल परब यांनी आपले अपयश झाकण्यासाठी, मी आणि सदाभाऊ खोत एस.टी कर्मचाऱ्यांची डोकी भडकवत आहोत, असे वारंवार आरोप केले आहेत. पण तीन आठवड्यांचा कालावधी गेल्यानंतरसुद्धा आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात मंत्री म्हणून अपयशी ठरले आहेत. आता ते मुघलशाही पद्घतीने मेस्मा कायदा लावण्याची धमकी देत आहेत." अशी टीका आमदार पडळकर यांनी केली आहे. 
 
हे आरोप करताना पडळकर यांनी "माझ्या भावाला बेकायदेशीरपणे सांगली जिल्हाबंदी केली आहे", असा आरोप केलाय.  ज्या पद्धतीने राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत अधिकाऱ्यांमार्फत माझ्यावर दबाव आणण्यासाठी माझ्या भावाला बेकायदेशीरपणे सांगली जिल्हाबंदी केली आहे.  त्याच चलाखीचा वापर करत जर खरोखर मनापासून कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला असता तर आज नक्कीच काही मार्ग निघाला असता असे पडळकर यांनी म्हटले आहे.
 
कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेट
परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत जे एसटी कर्मचारी कामावर येतील त्यांना कामावर घेतलं जाईल, त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. जे कर्मचारी कामावर आले आहेत, त्यांना वेतनवाढ दिली आहे. जे कामावर येतील त्यांना वेतनवाढ दिली जाईल, अशी माहिती मंत्री परब यांनी दिली आहे. 

दरम्यान, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी महिनाभरापेक्षा जास्त दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. विलिनीकरणाचा मुद्दा सध्या न्यायालयातच्या आधीन आहे. संपावर तोडगा काढून एसटीची सेवा पुर्ववत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर काही कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेऊन कामावर परतले आहेत तर काही कर्मचारी अजूनही संपावर ठामच आहेत. एसटी सेवा बंद असल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून महामंडळाचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. 

संबंधित बातम्या 

एसटी कर्मचाऱ्यांना सोमवारपर्यंत शेवटचं अल्टिमेटम! 'कामावर आले तर निलंबन मागे' : अनिल परब

St Workers Strike : एसटी संपाचे 30 दिवस..., कर्मचाऱ्यांचा निर्धार ठाम; आंदोलनाची पुढची दिशा काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Gavaskar Dance Video : असा 'लिटील मास्टर' डान्स होणे नाही! टीम इंडिया जिंकताच सुनील गावसकरांचं थेट मैदानात भन्नाट सेलिब्रेशन, राॅबिन उथप्पा पाहतच राहिला!
असा 'लिटील मास्टर' डान्स होणे नाही! टीम इंडिया जिंकताच सुनील गावसकरांचं थेट मैदानात भन्नाट सेलिब्रेशन, राॅबिन उथप्पा पाहतच राहिला!
Ind vs NZ Champions trophy 2025: न्यूझीलंडने सगळी अस्त्रं वापरली, हवेत उडून फिल्डिंग, टिच्चून बॉलिंग, क्षेत्ररक्षणाची अभेद्य तटबंदी; पण टीम इंडियाच्या वाघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकलीच
एक मावळा पडताच दुसरा खंबीरपणे उभा राहिला, इंच इंच लढून टीम इंडियाच्या वाघांनी गड फत्ते केला
लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, नमो शेतकरी महासन्मानच्या रकमेत वाढ, महायुती सरकार आश्वासन पूर्ण करणार? अर्थसंकल्पाकडे राज्याचं लक्ष
लाडक्या बहिणींना 2100 रुपये ते शेतकऱ्यांची कर्जमाफी, महायुती सरकार निवडणुकीतील आश्वासनं अर्थसंकल्पात पूर्ण करणार का?
Weekly Horoscope 10 To 16 March 2025: मार्चचा दुसरा आठवडा 'या' राशींसाठी राहील खास! कोणाला घ्यावी लागेल विशेष काळजी? वाचा 12 राशींच साप्ताहिक राशीभविष्य
मार्चचा दुसरा आठवडा 'या' राशींसाठी राहील खास! नोकरी, प्रेम आरोग्य, कोणाला घ्यावी लागेल विशेष काळजी? वाचा 12 राशींच साप्ताहिक राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08.00 AM TOP Headlines 08.00 AM 10 March 2025ABP Majha Marathi News Headlines 07.00 AM TOP Headlines 07.00 AM 10 March 2025Majha Gaon Majha Jilha | माझा गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 6: 30 AM TOP Headlines 630 AM 10 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Gavaskar Dance Video : असा 'लिटील मास्टर' डान्स होणे नाही! टीम इंडिया जिंकताच सुनील गावसकरांचं थेट मैदानात भन्नाट सेलिब्रेशन, राॅबिन उथप्पा पाहतच राहिला!
असा 'लिटील मास्टर' डान्स होणे नाही! टीम इंडिया जिंकताच सुनील गावसकरांचं थेट मैदानात भन्नाट सेलिब्रेशन, राॅबिन उथप्पा पाहतच राहिला!
Ind vs NZ Champions trophy 2025: न्यूझीलंडने सगळी अस्त्रं वापरली, हवेत उडून फिल्डिंग, टिच्चून बॉलिंग, क्षेत्ररक्षणाची अभेद्य तटबंदी; पण टीम इंडियाच्या वाघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकलीच
एक मावळा पडताच दुसरा खंबीरपणे उभा राहिला, इंच इंच लढून टीम इंडियाच्या वाघांनी गड फत्ते केला
लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, नमो शेतकरी महासन्मानच्या रकमेत वाढ, महायुती सरकार आश्वासन पूर्ण करणार? अर्थसंकल्पाकडे राज्याचं लक्ष
लाडक्या बहिणींना 2100 रुपये ते शेतकऱ्यांची कर्जमाफी, महायुती सरकार निवडणुकीतील आश्वासनं अर्थसंकल्पात पूर्ण करणार का?
Weekly Horoscope 10 To 16 March 2025: मार्चचा दुसरा आठवडा 'या' राशींसाठी राहील खास! कोणाला घ्यावी लागेल विशेष काळजी? वाचा 12 राशींच साप्ताहिक राशीभविष्य
मार्चचा दुसरा आठवडा 'या' राशींसाठी राहील खास! नोकरी, प्रेम आरोग्य, कोणाला घ्यावी लागेल विशेष काळजी? वाचा 12 राशींच साप्ताहिक राशीभविष्य
Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
Embed widget