Raigad Talai Landslide : आम्ही पोहोचलो, अधिकारी का नाही? बचावकार्यातल्या दिरंगाईवर विरोधकांचं बोट
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळई गावातील परिस्थितीचा आढवा घेतल्यानंतर बचावकार्यातल्या दिरंगाईवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहे
रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळई गावात दरड कोसळून जवळपास 36 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनास्थळी विरोधकांपैकी सर्वात अगोदर भाजप नेते गिरीश महाजन आणि प्रविण दरेकर पोहचले आहे. परिस्थितीचा आढवा घेतल्यानंतर बचावकार्यातल्या दिरंगाईवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. आम्ही पोहचलो, मग अधिकारी का नाही? असा सवाल देखील गिरीश महाजन यांनी केला आहे.
गिरीश महाजन म्हणाले, सध्या गावातील परिस्थिती गंभीर आहे. गावात आक्रोश आहे. कालपासून मदत न गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. गावकऱ्यांनीच अनेक मृतदेह कालपासून ढिगाऱ्याखालून काढले. घटनेच्या इतक्या तासानंतर देखील मदत कार्य पोहचले नाही. माझ्या आत्तापर्यंतचा कार्यकाळातील हा सगळ्यात वाईट अनुभव आहे.
यंत्रणेला गतीशील करण्याचा प्रयत्न करत आहे : प्रविण दरेकर
प्रविण दरेकर अत्यंत विदारक चित्र आहे. परंतु यंत्रणेला गतीशील करण्याचा प्रयत्न करत आहे. दळवळण पूर्णपूणे ठप्प झाले आहे. गावातील लोकांसाठी अन्नपाण्याची सोय करत आहे. यंत्रणेला सहकार्य करून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून कोकणातील काही शहरं आणि गावं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सततच्या पावसामुळं सातारा आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. यात सर्वात मोठी दुर्घटना ही तळई गावात घडली असून या घटनेने हाहाकार माजला आहे.
कशी घडली दुर्घटना?
काल रात्रीच्या सुमारास ही दरड कोसळल्याची माहिती आहे. मात्र हा दुर्गम डोंगराळ भाग असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. मात्र काही वेळापूर्वी एनडीआरएफची टीम ज्यावेळी इथं पोहोचली त्यावेळी ही भयंकर घटना समोर आली. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. गेल्या काही तासांपासून इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. एनडीआरएफसह स्थानिक प्रशासनची टीम देखील या ठिकाणी काम करत आहे. घटनेनंतर या गावालगतच्या सर्व वाड्यांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :