एक्स्प्लोर
औषधांच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार, भाजपचा नवा फंडा
भाजपने स्वस्त औषधांच्या दुकानातून आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली आहे.
लातूर : औषधांच्या माध्यमातून कुठल्या राजकीय पक्षाचा प्रचार होऊ शकतो असा विचारही कधी आपण केला नसेल. मात्र, लातूरमध्ये भाजपने ही किमया साधली आहे.
भाजपने स्वस्त औषधांच्या दुकानातून आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली आहे. स्वस्तात औषध विकणाऱ्या एक हजार जेनेरिक औषधांच्या दुकानाची देशभरात साखळी कार्यरत आहे. या औषधांच्या पाकिटांवर आणि दुकानांवरही भाजप अशा शब्दांचा उल्लेख असल्याचं पाहायला मिळत आहे. ही औषधं कमी दरात उपलब्ध असल्यानं ही दुकानं नागरिकांच्या पसंतीला उतरत आहेत.
मात्र, अशा प्रकारे एखाद्या पक्षानं आपला प्रचार करण्यासाठी औषधांचा वापर करणं किती योग्य आहे, असा सवाल आता विचारला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement