एक्स्प्लोर
मुंबई-गोवा महामार्गावर झाडं कोसळलं, महामार्ग ठप्प
सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर कणकवलीजवळ झाड पडल्यानं महामार्ग ठप्प झाला आहे. आज संध्याकाळी रस्त्याच्या बाजूचं मोठं झाड महामार्गावरुन जाणाऱ्या ट्रकवर कोसळलं. यात ट्रकचंही मोठं नुकसान झालं आहे.
कणकवलीतील शासकीय विश्रामगृहाजवळ आज संध्याकाळी हे झाड पडलं आहे. झाड पडल्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा असलेली वीजही खंडित झाली आहे. तसंच दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
प्रशासनाकडून महामार्गावरील झाड बाजूला काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरात लवकर एकेरी वाहतूक सुरु करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
अक्षय्यतृतीया ते सोमवारी असलेला महाराष्ट्र दिन सुट्टी असल्यानं अनेकांची पावलं गोव्याकडे वळली आहेत. मात्र महामार्ग ठप्प झाल्यानं सर्वांनाच नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement