एक्स्प्लोर
Advertisement
अखेर भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावरील टोल बंद, कंपनीबरोबरचा रस्त्याचा करारही रद्द
दुगाडफाटा येथे झालेल्या अपघातात डॉ. नेहा शेख या तरुणीच्या मृत्यूनंतर झालेल्या जनआंदोलनानंतर राज्य सरकारला अखेर जाग आली असून सुप्रीम कंपनीचे या मार्गावरील आनगाव आणि वाघोटे येथे असलेले टोलनाके बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पालघर : वाडा-भिवंडी महामार्गावरील खड्यांमुळे एका डॉक्टर तरुणीचा नाहक बळी गेला होता. दुगाडफाटा येथे झालेल्या अपघातात डॉ. नेहा शेख या तरुणीच्या मृत्यूनंतर झालेल्या जनआंदोलनानंतर राज्य सरकारला अखेर जाग आली असून सुप्रीम कंपनीचे या मार्गावरील आनगाव आणि वाघोटे येथे असलेले टोलनाके बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सुप्रीम कंपनी बरोबर असलेला करारही रद्द करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव चंद्रशेखर जोशी यांनी दिले आहेत.
मागील आठ वर्षांपासून सुप्रीम कंपनीने घेतलेले भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाचे काम अनेक ठिकाणी निकृष्ट असून अपूर्ण आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा रस्ता पूर्ण झाल्याचा दाखला देण्यात आला होता. या निकृष्ट कामामुळे तसेच अपूर्ण कामांमुळे अनेक अपघात घडून निष्पाप नागरिकांना जीव गमावावा लागला आहे. आजपर्यंत जवळपास 350 नागरिकांचा जीव या रस्त्याच्या अपूर्ण आणि निकृष्ट कामामुळे गेला आहे. तसेच अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.
त्याबाबत अनेक आंदोलने झाली. मात्र ढिम्म प्रशासनाचे याकडे लक्ष देत नव्हते. याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत न्यायालयाने 6 महिन्यापर्यंत हा रस्ता पूर्ण करण्याचे आदेश सदर रोड बनविणाऱ्या कंपनीला दिले होते. मात्र सहा महिने पूर्ण होत आले असतानाही हा रस्ता पूर्ण होत नसल्याचे लक्षात येता सार्वजनिक।बांधकाम विभागाचे सचिव चंद्रशेखर जोशी यांनी सुप्रीम कंपनीसोबत असलेला करार रद्द केला. आणि या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
या टोल बंद करण्याचा निर्णयाने तसेच सुप्रीम कंपनीकडून काम काढून घेण्याच्या निर्णयामुळे भिवंडी आणि वाडा तालुक्यातील जनतेने स्वागत केले असून तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीचे तसेच अपूर्ण असलेले पूल व रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement