एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास धमकावलं; तक्रारीत धक्कादायक आरोप

Beed: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याने सुरवातीला आवादा एनर्जी कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यास धमकावले होते. असा उल्लेख तक्रारदार सुनील शिंदे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

बीड:  मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणात एक अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले याने सुरवातीला आवादा एनर्जी कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यास धमकावले होते. असा उल्लेख तक्रारदार सुनील शिंदे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

मी व शिवाजी थोपटे असे कार्यालयात हजर असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुदर्शन घुले हा आमच्या मस्साजोग येथील प्रकल्पाच्या ठिकाणी आला आणि त्याने पुन्हा काम बंद करा, अन्यथा जी मागणी यापूर्वी केलेली आहे त्याची पूर्तता करा. असे म्हणून केज मध्ये चालू असलेल्या इतर ठिकाणचे आवादा कंपनीचे सर्व काम बंद करा, अन्यथा तुमचे हात पाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकील, असे म्हणत धमकी दिली होती. 6 डिसेंबर रोजी पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या घटनेनंतर केज पोलीस ठाण्यात प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीत हा उल्लेख करण्यात आला आहे.

तर कायमची वाट लावून टाकेन, हातपाय तोडून टाकेन

दोन कोटी रुपयांची खंडणी दिली नाही, तर कायमची वाट लावून टाकेन, हातपाय तोडून टाकेन, अशी धमकी वाल्मिक कराडने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दिल्याचे समोर आलं आहे ही धमकी वाल्मीक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून दिली होती. या संदर्भातील सर्व रेकॉर्डिंग आवादा कंपनीचे अधिकारी सुनील केदु शिंदे यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग झाले आहे. आता हे रेकॉर्डिंग सीआयडीच्या सुद्धा हाती लागलं आहे त्यामुळे त्याची तपासणी केली जात आहे.  दोन कोटीच्या खंडणीसाठी वाल्मीक कराडने 29 नोव्हेंबर रोजी फोन केला होता. हा फोन विष्णू चाटेच्या फोनवरून सुनील शिंदे यांना करण्यात आला होता. त्यावेळी विष्णूने वाल्मिक अण्णा बोलणार असल्याचे सांगितले होते. यावेळी बोलताना वाल्मीक कराडने सुदर्शनने सांगितलं आहे त्याच स्थितीमध्ये काम बंद करा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील आणि काम चालू केल्यास याद राखा अशी धमकी दिली होती. त्यानंतर त्याच दिवशी सुदर्शन घुले सुद्धा कार्यालयामध्ये पोहोचला होता.  

चार लोखंडी रॉड, फायटर, कत्ती आणि लाकडी काठीने केली मारहाण

सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आणखी दोन आरोपींचा यात समावेश करण्यात आला आहे. या घटनेत सरपंच देशमुख याला झालेल्या मारण्यात तब्बल 56 जखमा अंगावर आढळून आल्या. ज्यात एक गॅसचा पाईप त्याची लांबी 41 इंच होती. त्यावर मूठ तयार करून हत्यार बनविण्यात आले. तसेच लाकडी दांडा तलवारी सारखे धारदार शस्त्र, चार लोखंडी रॉड, लोखंडी फायटर धारदार कत्ती वापरण्यात आली. त्यातील एक गॅस, पाच क्लस वायर, लोखंडी रॉड, लाकडी काठी, पांढऱ्या प्लास्टिक पाईपचे तुकडे स्कॉर्पिओ, स्विफ्ट गाडी आणि पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.

आणखी वाचा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raigad Politics: 'सुनील तटकरेंना जशास तसं उत्तर देऊ', शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवींचा थेट इशारा
Pawar Politics: 'भाजपवर राग, अजित पवारांवर नाराजी', रोहित पवारांच्या वक्तव्याने नव्या चर्चेला उधाण
Central Team Survey: 'केंद्राचं पथक दाखवा, १०० रुपये मिळवा', Uddhav Thackeray यांचा टोला
Leopard Attack: पुणे हादरलं! अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला, थरार CCTV मध्ये कैद
Uddhav Thackeray Marathwada : ‘कर्जमाफीशिवाय मागे हटणार नाही’, ठाकरेंचा शेतकऱ्यांना शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
ऋतुराज गायकवाडची थेट उपकर्णधारपदी नियुक्ती, आफ्रिका दौऱ्यात मोठी जबाबदारी सोपवली, भारत अ संघात कोणाकोणाची निवड? 
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मोठी बातमी : ऋषभ पंतचं पुनरागमन, उपकर्णधारपदी नियुक्ती, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Tata Bike : टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
टाटा बाईक फक्त 18 हजारांमध्ये? टू व्हिलर मार्केटला हादरवणाऱ्या बातमीमागचं सत्य काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2025 | बुधवार
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा राजेशाही थाटात साखरपुडा, व्हिडिओ व्हायरल; काय करतो होणारा जावई?
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
Solapur VIDEO : केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
केंद्रीय पथक रात्रीतून आलं, आपापासात हिंदीत बोललं, पण आमचं ऐकूनही घेतलं नाही; कोळेगावच्या ग्रामस्थांचा संताप
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
फलटण प्रकरणातील गोपाळ बदने पोलीस खात्यातून बडतर्फ!, खातेअंतर्गत चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर
Embed widget