एक्स्प्लोर
Advertisement
नागपुरातील कुख्यात गुंड बाल्या गावंडेची हत्या
नागपूर : नागपुरातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. तुकारामनगरमध्ये कुख्यात गुंड बाल्या गावंडेची हत्या झाली आहे. बाल्या गावंडे हा नागपुरातील कुख्यात गुंड होता. सध्या तो प्रॉपर्टी डिलिंगची कामं करायचा.
धक्कादायक म्हणजे भर रहिवाशी वस्तीत बाल्या गावंडेची हत्या करण्यात आली. तुकारामनगरमधील एका इमारतीच्या टेरेसवर पार्टी करण्यासाठी त्याला बोलवण्यात आले आणि दगाबाजी करत त्याची अनेकांनी मिळून हत्या केली. हत्या केल्यानंतर बाल्या गावंडेचा मृतदेह जवळील झुडुपात फेकून देण्यात आले. पहाटे स्थानिक नागरिकांना मृतदेह दिसल्यानंतर पोलिसांना याबाबत कळवण्यात आले.
दरम्यान, नागपुरातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याची कायमच तक्रार होते आहे. मात्र, आता या गुन्हेगारीने गंभीर रुप घेतलं आहे. भर रस्त्यात भर दिवसा हत्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळे मूळचे नागपूरचे असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पावलं उचलणार का, असा प्रश्न सामन्य नागपूरकर विचारत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement