एक्स्प्लोर
मराठीच्या मुद्द्यासह मनसे पुन्हा मैदानात!
मुंबई : काहीही झालं तरी मराठीचा मुद्दा सोडायचा नाही. निवडणुकीमध्ये मतं मिळोत अथवा न मिळो, मराठीचा मुद्दा टोकाला न्यायचा. सोबतच पक्ष बांधणीसाठी संघटनेत बदल करायचा, अशी रणनिती मनसेच्या बैठकीत ठरवण्यात आली.
पक्षाला लागलेली गळती आणि महापालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर मनसेने पक्ष बांधणीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये गट अध्यक्षांपासून ते नेते मंडळी किंवा सर्व मनसे कार्यकर्त्यांनी दिलेली माहिती राज ठाकरे यांना देण्यात आली.
पक्षवाढीसाठी मनसे नेत्यांनी काय काम करावं, याचं मार्गदर्शन राज ठाकरे यांनी केलं. नेत्यांना कानपिचक्याही दिल्या. नेत्यांना राज ठाकरे काय बोलले ते आता सांगत नाही. पण कुटुंबप्रमुख म्हणून त्यांना आम्हाला बोलण्याचा हक्क आहे, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बैठकीनंतर दिली.
राज ठाकरे लवकरच मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात विभागनिहाय कार्यकर्त्यांना भेटून पुढील वाटचाल ठरवतील. गद्दारांवर कारवाई केली जाणार आहे. मनसेचा पराभव का झाला याची कारणमीमांसा आधीच झाली आहे. ती कारणे लक्षात घेऊनच आजची बैठक झाली आणि पुढील वाटचालीची दिशा ठरवत आहोत, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव या तीन महापालिकांच्या निवडणूका आहेत, त्याबद्दलही बैठकीत चर्चा करण्यात आली. पुन्हा दोन ते तीन दिवसांत बैठक घेऊन निवडणुकीसंदर्भात चर्चा होईल, असंही बाळा नांदगावकर म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement