एक्स्प्लोर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर

सीबीआयने 90 दिवसात दोषारोपपत्र दाखल न केल्याने आणि सीबीआयचे वकिल आज अनुपस्थित असल्याने कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सीबीआयने 90 दिवसात दोषारोपपत्र दाखल न केल्याने आणि सीबीआयचे वकिल आज अनुपस्थित असल्याने कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सीबीआयचे तपास अधिकारी दिल्लीतील कामांमध्ये व्यस्त आहेत त्यामुळे आम्हाला २० डिसेंबरपर्यंत वाढीव मुदत द्यावी अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. मात्र पुणे सत्र न्यायालयाने सीबीआयची मागणी फेटाळून लावली. तिघांच्या अटकेला 90 दिवस पूर्ण झाल्याने बुधवारी या तिघांच्या वकिलांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा या तीनही आरोपींविरुद्ध यु. ए. पी. ए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. दहशतवादी कृत्य केल्याचा आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा त्यांच्याविरुद्ध आरोप ठेवण्यात आला होता. त्यामुळे सीबीआयने दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी केवळ एक अर्ज जरी दाखल केला असता तरी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला असता. मात्र सीबीआयकडून ते देखील करण्यात आले नाही. पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी हे तीनही आरोपी लगेच तुरुंगातून सुटणार नाहीत. कारण अमोल काळे हा सध्या गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर एसआयटीच्या ताब्यात आहे तर राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर हे दोघे गौरी लंकेश आणि एम. एम कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीच्या ताब्यात आहेत. अमोल काळे हा चारही हत्याप्रकरणांमध्ये मास्टरमाईंड आहे. चारही हत्यांचा कट आखण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. राजेश बंगेराने कर्नाटकातील जंगलांमध्ये मारेकऱ्यांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे तर अमित दिगवेकर हा दाभोलकर हत्येसाठी रेकी करण्यात सहभागी होता.

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर

Embed widget