एक्स्प्लोर

सरकारवर मी नाही तर जनता नाराज, आमच्या  मागण्यांची दखल घेत नसेल तर निवडणुकीत त्यांना दखल घ्यावी लागेल; बच्चू कडूंचा इशारा

Bacchu Kadu: काही आमदारांना असं वाटतंय की आपण खूप मेहनत केली,  घरदार विकून जो पैसा मिळाला तो आपण या लाडक्या बहिणीसाठी लावला. मात्र हा जनतेचा पैसा आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

मुंबई सरकारवर मी नाही तर जनता नाराज, सरकार जर आमच्या  मागण्यांची दखल घेत नसेल तर निवडणुकीत त्यांना दखल घ्यावी लागेल, असा इशारा  प्रहार जनशक्तीचे प्रमुख  बच्चू कडू  (Bacchu kadu)  यांनी सरकारला दिला आहे.  लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाणारा पैसा जनतेचा आहे. पण काही आमदारांना  लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojna)  वापरला जाणारा पैसा काहींना बाप-दादांच्या कमाईचा पैसा वाटतो, अशी टीका बच्चू कडू यांनी रवी राणांवर केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. तसेच  दिव्यांग अभियानाचा फक्त नावापुरता अध्यक्ष, दिव्यांगांसदर्भातले निर्णयही कळवले जात नाहीत अशी खंत देखील  बच्चू कडूंनी व्यक्त केली 

बच्चू कडू म्हणाले,  आम्हाला नावापुरता दिव्यांग कल्याण अभियानाचा अध्यक्ष केला आहे. जिल्ह्यात जा आणि तक्रारी घ्या एवढंच आमचं काम आहे. दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात हे आम्हाला कळवलं सुद्धा जात नाही. अनेक गोष्टींसाठी आम्हाला भांडावं लागतं आणि भांडून आम्ही ते करून घेतो.  सरकारने जर आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर निवडणुकीतून आम्ही दखल दाखवून देऊ. मी नाराज नाही पण लोक या सरकारवर नाराज आहे.

अनाथांना विधवा महिलांना का बाजूला ठेवता? बच्चू कडूंचा सवाल

लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  बच्चू कडू म्हणाले,  तुम्ही लाडकी बहीण आणली 1500 रुपये देत आहे.  दिव्यांगांचा महिना आता दीड हजार केला? अडचणीत असणाऱ्यांसाठी तुमचे हात समोर येत नाहीत. लाडकी बहीण योजना चांगली पण तुम्ही दिव्यांगांना का बाजूला ठेवता ? अनाथांना विधवा महिलांना का बाजूला ठेवता ? त्यांना तुम्ही लाडकी बहीण म्हणत नाही? विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा पगार मिळेल तेवढेच मिळणार, लाडकी बहिणीचा त्यांना फायदा होणार नाही.

लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाणारा पैसा काहींना बाप-दादांच्या कमाईचा पैसा वाटतो : बच्चू कडू

आमदार रवी राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडू म्हणाले, काही आमदारांना असं वाटतंय की आपण खूप मेहनत केली,  घरदार विकून जो पैसा मिळाला तो आपण या लाडक्या बहिणीसाठी लावला.  जनतेचा पैसा आहे, सरकारी पैसा हा सगळा आहे. लोकं कर भरतात याचा विसर या लोकांना पडला आहे.   यांना वाटतं आपल्या बाप दादाच्या कमाईतून ही योजना चालू आहे, हे चुकीचा आहे.  सरकार हे लोकांसाठी असतं आणि जर लोकांसाठी सरकार नसेल तर आमचा रक्तातील दोष म्हणा किंवा चांगुलपणा म्हणा तो राहणारच आहे.

हे ही वाचा :

लाडक्या बहिणींना दिलेला पैसा यांच्या बापाचा आहे का? सरकारनं महिलांची माफी मागावी,वडेट्टीवार संतापले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Embed widget