एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबादच्या प्राध्यापिकेकडून एव्हरेस्ट शिखर सर
औरंगाबादच्या प्राध्यापिका मनिषा वाघमारे यांनी सोमवारी सकाळी आठ वाजता एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलं.
औरंगाबाद : औरंगाबादच्या प्राध्यापिकेने अवघड एव्हरेस्ट मोहीम यशस्वीरित्या सर केली आहे. मनिषा वाघमारे यांनी सोमवारी सकाळी आठ वाजता एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलं.
मनिषा वाघमारेंनी 2017 मध्येही एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न केला होता. प्रकृती ठणठणीत असूनही शिखरमाथा अवघ्या 170 मीटर अंतरावर असताना मनिषा यांना निसर्गाच्या अवकृपेमुळे माघारी फिरावं लागलं होतं.
मनिषा यांनी त्यानंतरही अजिबात न खचता पुन्हा एव्हरेस्ट सर करण्याची मोहीम आखली. इंडियन कॅडेट फोर्स (आयसीएफ)ची स्वयंसेवक आणि महिला महाविद्यालयाची शारीरिक शिक्षण विभाग संचालक असलेल्या मनिषा यांनी एव्हरेस्ट परिसरातील शिखरांवर आपला सराव सुरु ठेवला होता.
मनिषा यांनी 8 हजार 848 मीटरवर सोमवारी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी समिट गाठल्याची माहिती आयसीएफच्या जगदीश खैरनार यांनी दिली. अशाप्रकारे मनिषा यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement