एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये सॅमसंगच्या गोदामाला आग, फ्रीज, वॉशिंग मशीनचा कोळसा

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये रात्री इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत 500 फ्रीज आणि 500 वॉशिंग मशीनचा कोळसा झाला आहे. वाळूंज येथील सॅमसंग कंपनीच्या गोदामाला काल रात्री आग लागली होती.गोडाऊनमधील एलईडी, फ्रीज, ए. सी., मायक्रोओव्हन, वॉशिंग मशीन आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
औरंगाबादमध्ये गोडाऊनला भीषण आग, अग्निशमनच्या 4 गाड्या घटनास्थळी
अग्निशमन दलाचे पाच गाड्या रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत होते. अखेर पाच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आलं. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही.आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
महाराष्ट्र























