एक्स्प्लोर
नागपूरमध्ये पेट्रोल पंप मालकावर जीवघेणा हल्ला, बँकेसमोरच 16 लाखांची लूट
नागपूर: नागपूरच्या वाडी भागात भरदिवसा पेट्रोल पंप मालकावर हल्ला करुन 16 लाखांची लूट करण्यात आली आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीच्या परिसरात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
जगमल सिंह यादव शहराबाहेरील स्टेट बँकेत पैसे जमा करण्यासाठी आले असता आधीच दबा धरुन बसलेल्या तिघा तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला.धारदार शस्त्रांनी यादव यांच्या डोक्यावर वार करण्यात आले आणि काही कळायच्या आतच यादव यांचे 16 लाख रुपये लुटले.
भारतीय वायू सेनेतून निवृत्त झालेले जगमल सिंह यादव यांचा शहराच्या बाहेर असलेल्या बाजारगाव येथे पेट्रोल पंप आहे. शहराच्या वेशीवर असलेल्या या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील या स्टेट बँकेत पैसे जमा करण्याकरता यादव आले होते. १६ लाख रुपये असलेली बॅग घेऊन यादव गाडी खाली उतरताच आधीपासून दबा धरून बसलेल्या तिघा तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. पैशाची बॅग हिसकावून तिघे हल्लेखोर बाईकवरुन पसार झाले.
यादव यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित होता आणि त्यांच्या हालचालींची पूर्ण माहिती घेत त्यांच्या नजीकच्याच व्यक्तीने हा हल्ला केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, यादव यांना उपचाराकरिता वायू सेनेच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं असून सध्या पोलीस हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement