एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बीडमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने जीवघेणा हल्ला

बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून तलवारीने हल्ला करण्यात आला आहे. पीडित तरुणी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे.

बीड : एकतर्फी प्रेमातून "तू माझ्याशी का बोलत नाहीस" अशी कुरापत काढून एका अल्पवयीन मुलीवर तलवारीने वार केल्याची घटना बीड शहराजवळच्या रामनगर येथे शुक्रवारी घडली आहे. जखमी झालेल्या या मुलीवरती बीड शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. बीड ग्रामीण ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला.

बीड शहराजवळच्या रामनगर भागात राहणाऱ्या सत्तावीस वर्षीय पोपट बोबडे याच्या सोबत 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची ओळख होती. मागच्या वर्षभरापासून ती त्या तरुणासोबत काही वेळा बोलत होती. एप्रिल महिन्यामध्ये एकेदिवशी पोपट बोबडे हा अचानक त्या मुलीच्या घरी आला होता. त्यावेळी त्या मुलीच्या कुटुंबीयांनी "त्याला घरी का आला" असे विचारल्यानंतर मात्र तो त्या मुलीला पुन्हा बोलला नाही.

या घटनेनंतर त्या मुलीला तिच्या आई वडिलांनी आजीकडे बीड शहरामध्ये ठेवले होते. मागच्या दहा दिवसांपूर्वी त्या मुलीची आई आजारी असल्या कारणाने मुलगी बीड मधून रामनगरमध्ये गेली होती. तीस तारखेला म्हणजे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता त्या मुलीचे आई वडील हे किराणा दुकानावरती सामान आणण्यासाठी गेले होते. पीडित मुलगी तोंड धुण्यासाठी घराबाहेर आल्यानंतर पोपट बोबडे याने पाठीमागून येऊन अचानक तिच्यावर तलवारीने हल्ला केला. परंतु, हा वार तिने हातावर झेलला. त्यानंतर ती खाली कोसळली.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पीडित मुलगी घाबरली होती. पण निर्दयी पोपट बोबडेने 'माझ्याशी का बोलत नाही,' असे म्हणत पोपटने पुन्हा तिच्यावर दोन वार केले. यानंतर तो तेथून पसार झाला. तलवारीने केलेल्या हल्ल्यामध्ये या मुलीच्या पायाला फॅक्चर झाले होते. जखमी पीडित मुलीला बीड शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर चौकशी आणि तपास केल्यानंतर दोन दिवसांनी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात ग्रामीण ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान पोलिसांनी पोपट बोबडे याला अटक केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : रश्मी शुक्ला, अदानी ते महायुती सरकार;संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया #abpमाझाTop 90 At 9AM 26 November 2024 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या #abpमाझाSharad Pawar-Uddhav Thackeray : शरद पवार आणि उद्धव ठाकरे पराभूत उमेदवारांसोबत करणार चिंतनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 26 November 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
Nagraj Manjule : खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
Mahayuti CM: राज्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी 'या' 3 फॉर्म्युलांची जोरदार चर्चा, अजित पवारांचंही स्वप्न पूर्ण होणार?
राज्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी 'या' 3 फॉर्म्युलांची जोरदार चर्चा, अजित पवारांचंही स्वप्न पूर्ण होणार?
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
Embed widget