एक्स्प्लोर

देशहितासाठी भाजप राजकीय तडजोड करण्यास तयार; आशिष शेलारांची शिवसेनेला साद

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेसाठी आमचे दरवाजे कायम खुले असतील, असे म्हणत शिवसेनेला साद घातली होती. आज भाजप नेते आशिष शेलार यांनीदेखील त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे.

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायदा शिवसेनेने राज्यात लागू करावा, सरकार पडेल याची भीती बाळगू नये. गरज पडल्यास आम्ही राजकीय तडजोड करण्यास तयार आहोत, असे वक्तव्य करत भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला साद घातली आहे. काल (13 डिसेंबर) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शिवसेनेसाठी आमचे दरवाजे कायम खुले असतील, असे म्हणत शिवसेनेला साद घातली होती. आशिष शेलार म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशाच्या आणि राज्याच्या हिताचा आहे. या कायद्याच्या मदतीने राज्यातल्या पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलता येईल. हे घुसखोर राज्याचं हित साधू शकत नाहीत. निर्वासित हिंदू, पारशी, ख्रिस्ती, शिख, जैन लोकांना नागरिकत्व मिळावं, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. शिवसेनेनेही त्यास हातभार लावावा. नागरिकत्व दुरुस्ती कायदा राज्यात लागू करण्यास शिवसेनेला काँग्रेसने विरोध केला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना जुमानू नये. सरकार पडेल या भीतीपोटी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करु नये. शिवसेना देशहिताच्या भूमिकेत असायला हवी. शेलार म्हणाले की, देशहिताच्या दृष्टीने शिवसेनेने निर्णय घेतले, तर आम्ही त्यांच्यासाठी राजकीय तडजोडीची भूमिका घेऊ. शिवसेना कोणासमोरही झुकणारा पक्ष नाही. शिवसेनेने त्यांचा बाणा जपावा. दरम्यान, शेलार यांनी काँग्रेसच्या भारत बचाव आंदोलनावरही टीका केली आहे. शेलार म्हणाले की, काँग्रेसचं आंदोलन हे भारत बचाव आंदोलन नसून बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोर बचाव अशं आहे. पाहा काय म्हणाले आशिष शेलार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP MajhaBhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवालYuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयीABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Embed widget