एक्स्प्लोर
Advertisement
घंटानाद आंदोलनानं घंटा फरक पडत नाही; अर्जुन खोतकरांचं भाजपच्या आंदोलनावर टीकास्त्र
घंटानाद आंदोलन फक्त सरकारच्या द्वेषभावनेतून असून भाजपला मंदिरांशी काही देणंघेणं नसल्याची टीका माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केलीय.
जालना : भाजपच्या या घंटानाद आंदोलनानं घंटा फरक पडत नाही, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय. मंदिरं खुली करण्यासाठी आज भाजपच्या वतीनं राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आलं. त्या पार्श्वभूमीवर खोतकर बोलत होते. मंदिरं खुली करणं ही आमचीही भावना आहे. मात्र, प्रथम प्राधान्य हे आरोग्याला द्यावं लागेल. तसेच जबाबदार राज्यकर्ते जनतेचं हित लक्षात घेतात. मात्र, भाजपला मंदिरांशी काही देणंघेणं नसून हे फक्त सरकारच्या द्वेषभावनेतून होत असल्याचा आरोपही खोतकर यांनी केला.
भाजपला फक्त राज्यातलं वातावरण खराब करायचंय आहे. त्यांना जनभावनेशी आणि लोकांच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे नाही, असे खोतकर म्हणाले. भाजपच्या या आजच्या अशा घंटानाद आंदोलनानं सरकारला घंटा काही फरक पडत नाही, अशी घणाघाती टीका खोतकर यांनी भाजपवर केलीय. दरम्यान, राज्यभरात होत असलेल्या या घंटानाद आंदोलनात अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली करण्यात आली असून 5 पेक्षा अधीक भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी गर्दी केल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.
महाविकास आघाडी म्हणजे देवावर विश्वास नसलेली 'भूतं', चंद्रकांत पाटील यांची टीका
भाजपचं राज्यभर घंटानाद आंदोलन
भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात विविध ठिकाणी मंदिराबाहेर घंटानाद करण्यात आला. सरकारला जाग यावी या करिता हे आंदोलन करण्यात आले तसेच वारकरी संप्रदायाकडून देखील या बाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. एकीकडे सरकार मद्य विक्री केंद्रासाठी मुभा देत आहे. मात्र, मंदिरे का उघडत नाही? असा सवाल भाजपकडून करण्यात आला. विविध जिल्ह्यातील भाजप नेते, कार्यकर्ते या घंटानाद आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, अनेक ठिकाणी भाजपकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाले.
BJP Ghantanaad Andolan | दार उघड उद्धवा दार उघड मंदिरं खुली करण्यासाठी भाजपचं राज्यभर घंटानाद आंदोलन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement