मराठा आंदोलकांच्या मागण्यांबाबत संभाजीराजे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
मराठा क्रांती मोर्चाच्या समनव्यकांची बाजू खासदार संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर मांडणार आहेत. बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित राहणार आहे
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबतची खासदार संभाजीराजे यांची बैठक संपली आहे. खासदार संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीसाठी वर्षा बंगल्याकडे रवाना झाले आहे. बैठकीत शैक्षणिक प्रवेशासाठी एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुपर न्यूमररी सीट्स पद्दत लागू करण्याबाबत समनव्यकांची मागणी आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या समनव्यकांची बाजू खासदार संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर मांडणार आहेत. बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित राहणार आहे. बैठकीत अपेक्षित निर्णय न झाल्यास समनव्ययक पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 नंतरचे सर्व प्रवेश एसईबीसी वर्गासाठी आरक्षण न ठेवता करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडलेली होती. नोव्हेंबर उजाडला तरीही अकारावीची प्रवेश प्रक्रिया रखडलेली होती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून प्रेवश प्रक्रिया कधी सुरु होणार? असा सवाल वारंवार उपस्थित करण्यात येत होता. अशातच राज्य सरकारने यासंदर्भात अखेर निर्णय घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण आता न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश सरसकट सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता खुल्या प्रवर्गातून विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे लागणार आहेत. 9 सप्टेंबर 2020 ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होतो, मात्र त्यांना प्रवेश मिळालेले नव्हते. त्यांना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच हे सर्व प्रवेश मराठा आरक्षण उठवण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेच्या अधीन असणार आहेत.
महावितरणच्या नोकरभरतीविरोधात आजही मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला डावलून महावितरणकडून नोकरभरती सुरु झाल्याने मराठा क्रांती मोर्चाकडून जिल्हाभरातील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं जात आहे.