एक्स्प्लोर

Amruta Fadnavis Threat Case: अमृता फडणवीस यांना अनीक्षा जयसिंघानीची मोठी ऑफर, मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रात दावा

Amruta Fadnavis Threat Case: अनिल जयसिंघानी हे शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्कात असून व्हिडिओ आणि ऑडियो रेकॉर्डिंग त्यांच्यासह मोदींना पाठवण्यात येणार आहे, अशी धमकी देण्यात आली होती.

मुंबई : अमृता फडणवीस (Amruta Fadnavis ) यांना अनीक्षा जयसिंघानीची मोठी ऑफर होती असा दावा मुंबई पोलिसांच्या 793  पानांच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. मलबार पोलीस ठाण्यात बुकी अनिल आणि त्याची मुलगी अनीक्षा जयसिंघानींवर एफआयआर यापूर्वीच दाखल करण्यात आला आहे. बुकी जयसिंघानीवरील आरोप मागे घेण्यासाठी अमृता फडणवीसांना अनीक्षा जयसिंघानीनेही ही ऑफर दिली होती. सध्या बुकी अनिल जयसिंघानी न्यायालयीन कोठडीत आहेत. तर अनीक्षा जयसिंघानीची जामिनावर सुटका झाली आहे.

अनिक्षा,अनिल जयसिंघानी आणिअमृता फडणवीस यांच्यात काय संभाषण झाले?

अनिक्षा,अनिल जयसिंघानी आणि अमृता फडणवीस यांच्यातील चॅटद्वारे  संभाषण  झाले. हे चॅट आरोपपत्रात जोडले आहे.  या चॅटमध्ये अनिक्षा म्हणाली, माझ्या वडिलांना माहिती आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या विरोधात पोलीस वापरतील आणि ते व्हिडीओ खोटे असल्याचा दावा करतील पण त्यांचा काही उपयोग होणार नाही. शरद पवार, उध्दव ठाकरे आणि मोदी यांच्या नावे देखील धमकी दिली होती. अनिल जयसिंघानी हे शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्याशी संपर्कात असून व्हिडिओ आणि ऑडियो रेकॉर्डिंग त्यांच्यासह मोदींना पाठवण्यात येणार आहे. 

फडणवीसांची राजकीय कारकीर्द संपवण्याची धमकी

 हे प्रकरण बाहेर आल्यास मोठा राजकीय वाद निर्माण होऊन फडणवीस यांना त्यांच पद गमवाव लागेल आणि त्यांची राजकीय कारकीर्द संपेल अशी देखील धमकी दिली होती.  मुंबई पोलिसांनी 733 पानी आरोपपत्र दाखल केले त्यामध्ये याचा उल्लेख आहे. अनिल जयसिंघानिया यांचे सुद्धा अमृता फडणवीस यांच्याबरोबर चॅटवर बोलणं झालं होतं. कुप्रसिध्द बुकी अनिल जयसिंघानीला 1000 कोटी रुपयांचे नुकसान सोसावं लागलं. त्याच्या विरुद्ध असलेल्या 17  गुन्ह्यामुळे तो सतत पळत असल्याने नुकसान झाला असल्याचा दावा त्याने अमृता फडणवीस यांच्याशी बोलताना केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे 

ऑडियो रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी

या गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात 1 कोटी रुपयांची ऑफर अमृता फडणवीस यांना  करण्यात  आली होती . अनिल जयसिंघानी त्याची मुलगी अनिक्षा आणि तिचा चुलत भाऊ निर्मल विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.  ऑफर धुडकावल्यानंतर 10 कोटींची खंडणी मागितली अन्यथा त्याच्यातील व्हिडिओ आणि ऑडियो रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा दावा आरोपपत्रात  केला आहे. 

 संभाषणात अमृता फडणवीस यांनी अनिल जयसिंघानी यांना आश्वासन दिले होती की, सिंघानिया यांच्या विरोधात नोंदवलेले गुन्हे खोटे असल्यास ती मदत करण्यासाठी तिच्या पतीशी बोलेन असं पोलिसांनी त्यांच्या आरोपपत्रात म्हटले आहे. हे संभाषण प्रकरणानंतर दोन दिवसांनी झाले आहे. जेव्हा  त्यांची मुलगी अनिक्षाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण काय? 

काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात लाच प्रकरणात जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा हिला अटक करण्यात आली होती. अनिक्षा आणि अमृता फडणवीस यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध विकसित झाले. त्यानंतर अनिक्षा हिने अमृता फडणवीस यांना विनंती केली की, वडिलांवर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यांना गुन्हे किंवा तक्रारीमधून वाचवावे. मात्र या गोष्टीला अमृता फडणवीस यांनी नकार दिल्याने अनिक्षाने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनिक्षाने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असे हे प्रकरण आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीतAiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget