एक्स्प्लोर

Amruta Fadanvis Tweet: अजित पवारांनी शपथ घेतली मात्र अमृता फडणवीसांना शब्दच सापडेना, म्हणाल्या...

Amruta Fadanvis Tweet: अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. अमृता फडणवीस यांनी मात्र 2019 चे ट्विट रिट्विट केले आहे.

Amruta Fadanvis Tweet: पहाटेचा शपथविधी ते दुपारचा शपथविधी असा प्रवास करत अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर अनेकांना पहिला आठवला तो पहाटेचा शपथविधी. यावर बऱ्याच प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत. मात्र यावर अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांची 'ती' प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली आहे. अमृता फडणवीस यांनी थेट  2019 सालचे ट्विटच रिट्विट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडामोडींमध्ये अमृता फडणवीस यांनी तिच प्रतिक्रिया कायम ठेवली आहे. 

नेमकं काय आहे अमृता फडणवीस यांचं ट्विट?

साल 2019. पहाटेला राजभवानात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची नांदी झाली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राजकारणात पहिला भूकंप झाला. यावर बऱ्याच प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. तेव्हा अमृता फडणवीस यांनी देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंदन करत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. 

रविवार 2 जुलै 2023 रोजी या राजकीय घडामोडींमधील आणखी एक प्रयोग पूर्ण झाला आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण अमृता फडणवीसांनी मात्र त्यांचे 2019 सालचे ट्विटच रिट्विट केले आहे. त्यामुळे आजच्या घडामोडींवर अमृता फडणवीस यांना शब्दच सापडत नसल्याच्या चर्चा आता सोशल मिडियावर रंगू लागल्या आहेत. 

अजित पवारांच्या शपथविधीवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करत अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांचे अभिनंदन केले आहे. परंतु अजित पवारांच्या या बंडाला राष्ट्रवादीचा कोणताही पाठिंबा नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या अगदी दिग्गज नेत्यांच्या फळीचा या बंडामध्ये समावेश आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे,  अदिती तटकरे या नेतेमंडळींचा समावेश आहे. 

शरद पवारांनी मात्र या बंडाला पाठिंबा नाकारत राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचं स्पष्ट केलं आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आता ट्रिपल इंजिनचं सरकार आल्याचं म्हटलं आहे. अजित पवारांच्या या बंडावर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. पण यावर आता राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची पुढची भूमिका काय असणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. 

हे ही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर  'माझा'वर : ABP MajhaNagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफरABP Majha Headlines :  1:00PM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPratap Sarnaik vs Jitendra Awhad : जिथे रेव्ह पार्ट्या सुरु आहेत तिथे कारवाई झालीच पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
T20 World cup: विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या 11 खेळाडूंचं अभिनंदन करण्याऐवजी BCCIचे खजिनदार आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; विरोधकांचा सभात्याग
जिंकली टीम इंडिया, पण अभिनंदन आशिष शेलारांचं, सभागृहात हल्लाबोल, विरोधकांचा सभात्याग
Embed widget