एक्स्प्लोर
काश्मिरमध्ये अडकले, पैसे ट्रान्सफर करा, महिलेचा आमदारांना गंडा
काश्मिरात अडकल्याचं सांगून अमरावतीतील महिलेने तीन आमदारांकडून हजारो रुपये उकळले.
अमरावती : मदत मागण्याचा बहाणा करुन अमरावतीमध्ये एकाच महिलेने राज्यातला तीन आमदारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काश्मिरात अडकल्याचं सांगून महिलेने आमदारांकडून हजारो रुपये उकळले.
प्रियंका पवार असं नाव सांगणाऱ्या संबंधित महिलेने 5 एप्रिल रोजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांना फोन केला. आपण काश्मिरमध्ये दंगलीत अडकल्याचा दावा तिने फोनवर केला. आपल्याला अमरावतीतील घरी परतण्यासाठी पैशांची आवश्यक्ता असल्याचा बनाव तिने केला.
आमदार देशमुख यांनी उदात्त हेतूने पैसे महिलेच्या खात्यावर जमा केले. मात्र त्यानंतर देशमुखांनी महिलेचा अमरावतीतील पत्ता तपासून पाहिला, तेव्हा या नावाची कोणतीही महिला त्या पत्त्यावर राहात नसल्याचं समोर आलं.
फक्त आमदार सुनील देशमुख यांनाच नाही, तर गडचिरोलीचे आमदार देवराव रोही आणि जळगावचे आमदार सतीश पाटील यांनाही गंडवल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement