एक्स्प्लोर

 Maharashtra High Alert : मुंबईत नाकाबंदी, समुद्र किनारच्या जिल्ह्यात झाडाझडती, संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी

Maharashtra High Alert : रायगडमध्ये समुद्रात बोटीमध्ये काही शस्त्रास्त्र सापडल्यानंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra High Alert : रायगडमध्ये समुद्रात बोटीमध्ये काही शस्त्रास्त्र सापडल्यानंतर राज्यात हाय अलर्ट (High Alrt) जारी करण्यात आला आहे. मुंबईसह पुण्यामध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच पालघरच्या किनारपट्टी भागातही पालघर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली असल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे. रायगडमध्ये आज दोन संशयास्पद बोटी जप्त करण्यात आल्या त्या बोटींमध्ये शस्त्रसाठा सापडल्याने एकच खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आली आहे. राज्यातील सर्व किनारी भागात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. 

हरिहरेश्वर येथे सापडलेल्या एके 47 प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीस अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा झाली. सुरक्षेच्या कारणास्तव किनारी भागांसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या प्रकरणाची सर्व माहिती राज्य सरकारकडून केंद्रीय एजन्सींना देण्यात येत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच राज्यभरात हायअलर्ट जारी कऱण्यात आला आहे. तसेच इतर राज्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल रायगडला रवाना झाला आहेत. 

पुण्यात हाय अलर्ट-
रायगडमधील एका बोटीमध्ये शस्त्रासह साठा सापडल्यानंतर पुण्यात देखील हाय अलर्ट करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्तांनी दिली आहे. पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहेत. याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बोलावली तातडीची बैठक बोलवली आहे. 

किनारी भागात हाय अलर्ट - 
रत्नागिरीमध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरीच्या लँडिंग पॉईंटवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हरिहरेश्वरच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते श्रीवंर्धनला रवाना झाले आहेत. संजय मोहितेंसोबत विशेष पथकही रवाना झाले आहे. रायगडमध्ये आढळलेल्या बोटीची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथक रवाना झाले आहे. रायगडसह सर्वच किनारी जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

बोटीमध्ये एके 47 - 
रायगडमधील श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली. या बोटीमध्ये दोन  ते तीन एके-47 रायफल आढळल्या आहेत. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्याही त्या बोटीमध्ये मिळाल्या. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहेत.   या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

ओमान देशातील बोट - 
हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेली संशयास्पद बोट (Raigad Suspected Boat) ओमान देशातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या स्पीड बोटीवर आढळून आलेल्या नावाच्या कंपनीची नोंदणी ब्रिटनमधील असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. ही स्पीड बोट ओमानजवळ समुद्रात अडकली होती. या बोटीतील व्यक्तींची ओमानजवळच सुटका करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट त्याठिकाणी नांगर टाकून उभी करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट समुद्रातून वाहत रायगडजवळ आली असावी अशी माहिती सूत्रांनी दिली. 

घातपाताचा कट?
रायगडमध्ये शस्त्र असलेली बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी समुद्र मार्गे आले होते. त्याशिवाय, मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्सदेखील श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर उतरवण्यात आले होते. या सगळ्या भूतकाळांतील घटनांचा विचार करता पोलीस प्रशासनाची चिंता वाढली असून तपास सुरू करण्यात आला आहे. 

संशयास्पद बोटीबाबत आतापर्यंत काय काय माहिती समोर आली?

  • हरिहरेश्वर समुद्र किनारी संशयास्पद बोट आढळली.
  • बोटीवर 3 एके-47 रायफल्स आणि 225 राऊंड्स (काडतुसं) आढळले.
  • बोटीवर 10 बॉक्स सापडले.
  • बोटीची नोंदणी ब्रिटनमध्ये केली असल्याची माहिती.
  • बोटीवर असलेले दोन जण ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियाचे नागरिक असल्याची माहिती.
  • ही बोट ओमानमधून भरकटल्याची शक्यता.
  • संशयास्पद बोट आढळल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी.
  • बोटीवर हत्यारं आढळल्यानं संशय बळावला.
  • एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल घटनास्थळाकडे रवाना.
  • दहशतवादी कनेक्शन आहे का? याबाबत एटीएसकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

रायगड किनारा का महत्वाचा?

  • पश्चिम किनारपट्टीवरील रायगडचा किनारा संवेदनशील आहे.
  • रायगडच्या किनाऱ्यावरुन याआधीही स्फोटकं आल्याचा इतिहास आहे. 
  • 1993 च्या बॉम्बस्फोटाआधी रायगड किनाऱ्यावरच स्फोटकं उतरवण्यात आली. 
  • 2008 मध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ला समुद्रमार्गेच झाला होता. 
  • रायगड किनारपट्टी सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आहे. 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget