एक्स्प्लोर

Nagpur Metro : मेट्रोची 10 रुपये प्रवास स्कीम बंद; आता किलोमीटरनुसार द्यावे लागणार भाडे

मेट्रो प्रवाशांना 1 ते 6 किलोमीटरकरता 5 रुपये, 6 ते 9 किलोमीटरकरता 10 रुपये, 9 ते 12 किलोमीटरकरता 15 रुपये, 12 ते 15 किलोमीटर अंतरासाठी 20 रुपये आणि त्यानंतर 35 रुपये द्यावे लागणार आहे.

Nagpur Metro News :  नागपुरात कोरोना काळात प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता मेट्रोने 10 रुपयात मेट्रो प्रवास करण्याची सुविधा दिली होती. ही सुविधा आता बंद करण्यात आली असल्याने मेट्रो प्रवाशांना मोठा झटका बसला आहे. आता किलोमीटरनुसार प्रवाशांना भाडे द्यावे लागेल. 10 रुपये नाममात्र भाडे असल्याने मेट्रोच्या रायडरशिपमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. प्रतिदिन सरासरी 1.30-1.40 लाख लोक मेट्रोने प्रवास करीत होते. आता दरवाढीमुळे प्रवाशांची संख्या कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

असे आहेत प्रवासभाडे

मिळालेल्या माहितीनुसार आता 1 ते 6 किलोमीटरकरता प्रवाशांना 5 रुपये, 6 ते 9 किलोमीटरकरता 10 रुपये, 9 ते 12 किलोमीटरकरता 15 रुपये, 12 ते 15 किलोमीटर अंतरासाठी 20 रुपये आणि 15 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी 35 रुपये द्यावे लागेल. वरील दर कोराना काळापूर्वीसुद्धा लागू होते. आता एकदा पुन्हा मेट्रो व्यवस्थापनाने जुने दर लागू करण्याची घोषणा केली आहे. 

उत्पन्नही आवश्यक

यासंबंधी उपमहाव्यवस्थापक (कम्युनिकेशन) अखिलेश हळवे यांनी सांगितले की, मेट्रो संचालनकरता मोठ्या प्रमाणात खर्च लागतो. कोरोना काळात आम्ही स्कीम दिली होती, केवळ ती बंद केली जात आहे. याला भाडेवाढ म्हणता येणार नाही. भाडे वाजवी असून सुविधा भरपूर आहे. त्यामुळे याचा प्रवाशांच्या संख्येवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

रायडरशिपने नुकताच पार केला 2 लाखांचा टप्पा

2022 मध्ये रायडरशिपचे नवीन उच्चांक गाठल्यावर, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर मेट्रोने आणखी एक मैलाचा दगड गाठला होता. महामेट्रो ची रायडरशिप नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 2,02,608 वर इतकी होती. या वाढणाऱ्या प्रवासी संख्येचा अंदाज घेत महा मेट्रोने फेऱ्यात आज करता वाढ केली आणि रात्री 10.30 पर्यंत सर्वच टर्मिनल स्टेशनवर मेट्रो सेवा दिली होती. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-1 माननीय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांनंतर महा मेट्रोने हा महत्वाचा टप्पा गाठला होता. नागपूर मेट्रोने हा आकडा मेट्रो गाडीच्या  डब्यातील तसेच स्टेशन वरील गर्दी या वाढलेल्या रायडरशीपचे प्रमाण आहे.

ही बातमी देखील वाचा...

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाच, अध्यक्ष निवडीसाठी महाराष्ट्रातही निवडणूक घ्या; माजी आमदार आशिष देशमुख यांचं पक्षश्रेष्ठींना पत्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होताMihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
Embed widget