(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हाती
Mihir Shah Worli Heat and Run : आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल 'माझा'च्या हाती सध्या वरळी हीट अँड रन प्रकरात नवनवे खुलासे होत आहेत. ज्या बीएमडब्ल्यू गाडीने एका महिलेला चिरडले त्या गाडीत मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा (Rajesh Shaha) यांचा मुलगा मिहीर शाहा असल्याचं म्हटलं जातंय. मिहीर त्याच्या ड्रायव्हरसोबत अपघातग्रस्त गाडीतून प्रवास करत होता. दरम्यान, अपघाताआधी आरोपी मिहीरने नेमकं काय केलं? तो नेमका कुठे गेला होता? याचा घटनाक्रम समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिहीर शहा हा 24 वर्षांचा आहे. अपघातापूर्वी मिहीरने नेमकं काय केलं? मिळालेल्या माहितीनुसार वरळी हीट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा हा 24 वर्षाचा आहे. घटनाक्रमानुसार मिहीर शहा हा रात्री जुहू येथील एका बारमध्ये मध्यप्रशन करत होता. त्यानंतर तो गोरेगावला गेला होता. घरी गेल्यानंतर त्याने आपल्या ड्राइवरला लाँग ड्राईव्हला जाण्याचे सांगितले. प्रवासादरम्यान तो मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावला निघाला. गोरेगावला जाताना मिहीर शहा हा स्वतः गाडी चालवत होता. त्याच वेळी अट्रिक मॉलजवळ अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. अपघाताची घटना घडली तेव्हा मिहीर शहाने मध्यप्रशन केले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिहीरचा फोन बंद, पोलिसांकडून शोध चालू या प्रकरणात मिहीर शहासोबत राजरुपी राजेंद्र सिंग बिडावत हा त्याचा चालक होता. वरळीतील नेहरू तारांगण येथील बसस्टाॅपच्या विरूद्ध दिशेला सकाळी 5.15 वाजता हा अपघात झाला. अपघातावेळी गाडीत मिहीर शहा आणि चालक राजरुपी राजेंद्र सिंग बिडावत हे दोघेही होते. सध्या मिहीरचा फोन बंद येत असून त्याचा शोध सुरू आहे.