एक्स्प्लोर

Nana Patole : भाजप नेते गावगुंडाची तुलना पंतप्रधान मोदींशी करत आहेत, नाना पटोलेंचा आरोप

Nana Patole : विरोधकांकडून मला खलनायक करण्याचं काम सुरु आहे. माझ्यामागे कोणी नाही मी सामान्य कुटुंबातून आलो म्हणून मला टार्गेट करत आहेत, असा आरोप देखील नाना पटोलेंनी या वेळी केला.

मुंबई :  मोदी नावाचा गावगुंड आहे. भाजपच्या नेते गावगुंडाची तुलना मोदींशी करत आहेत, भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अवमान केला नाही.  भाजप नेत्यांनी वाद ओढावून घेतल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी केला आहे.  एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह  मुलाखतीत नाना पटोले बोलत होते. 

पटोले म्हणाले,  लोकप्रतिनिधींशी मी गावगुंडावर चर्चा केली. भाजपने मोदींची तुलना गावगुंडाशी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आम्ही चौकशी केली आहे. भाजपच्या नेत्यांच संतुलन बिघडले आहे.  'त्या' गावगुंडाने यावर स्पष्टीकरण दिलं, तरीही भाजप नेते आक्षेप घेतात. आमच्या पक्षात गोंधळ नाही, जे गोंधळी आहेत ते रस्त्यावर दिसत आहेत. माझ्या वक्तव्यातील मोदी म्हणजे पंतप्रधान मोदी नव्हे. मी  पंतप्रधानपदाचा अपमान होणार नाही याची काळजी घेणार आहे. 

विरोधकांकडून मला खलनायक करण्याचं काम सुरु आहे. माझ्यामागे कोण नाही मी सामान्य कुटुंबातून आलो म्हणून मला टार्गेट करत आहेत. शेतकऱ्यांवर गाड्या चालवणाऱ्यांचे पुतळे का नाही जाळले?, असा सवाल देखील पटोलेंनी भाजपला केला आहे.

यापूर्वी काय म्हणाले होते नाना पटोले?

भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो' असं वक्तव्य केलं होतं. एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ रात्रीच्या वेळीचा आहे. या प्रचाराच्या दरम्यान नाना पटोले यांच्याभोवती लोकांचा गराडा आहे. त्यावेळी बोलताना नाना पटोले म्हणतात की, 'मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो.' नाना पटोलेंचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यावर विविध पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. तर नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. राज्यात विविध पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.  

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Nana Patole : अखेर मोदी नावाचा 'गावगुंड' पोलिसांना गवसला, मात्र त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा नसल्याचं स्पष्ट

Nana Patole Controvercy : "ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं", नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा वादंग, भाजप आक्रमक

Nana Patole : माझ्याकडून चूक झाली असेल तर पोलिसांनी कारवाई करावी : नाना पटोले

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Sabha 2024 : कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Shivsena Assembly Election List : शिवसेनेच्या पहिल्या यादीत 45 नावं, आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
शिवसेनेच्या पहिल्या यादीत आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shivsena Eknath Shinde List : शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी समोर, विद्यमान आमदारांना पुन्हा संधीMuddyach Bola : कल्याण-डोंबिवलीत कुणाची हवा? अभिनेता Pandharinath Kamble सोबत मुद्याचं बोलाZero Hour : मविआ-महायुतीच्या जागावाटपाचा गोंधळ ते पुण्यात सापडलेले 5 कोटी,सविस्तर चर्चाZero Hour : ब्रिक्सची परिषदेत भेट, पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Sabha 2024 : कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Shivsena Assembly Election List : शिवसेनेच्या पहिल्या यादीत 45 नावं, आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
शिवसेनेच्या पहिल्या यादीत आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?;  विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात
अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?; विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
Umesh Patil :  यशवंत माने, राजन पाटील ते नरहरी झिरवाळ, बड्या नेत्यांनी शिस्त मोडून कारवाई नाही, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात तटकरेंना सवाल
राजन पाटील यांचे 'ते' वक्तव्य, छत्रपती शिवरायांचा दाखला, सुनील तटकरेंना सवाल, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात काय?
Embed widget