एक्स्प्लोर

अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?; विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात

भाजपाच्या पहिल्या यादीत 99 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले होते. याच यादीत अकोला पूर्व मतदारसंघातून पक्षाने तिसऱ्यांदा आमदार रणधीर सावरकर यांना संधी दिली आहे.

अकोला : 'घोडा का थांबला?'...  'भाकरी का करपली?',  या दोन्ही प्रश्नांचं एकच सामायिक उत्तर आहे. आणि हे उत्तर आहे, 'फक्त फिरवली नाही' म्हणून. भाजपने महाराष्ट्र विधानसभेसाठीच्या आपल्या पहिल्या यादीत 99 मतदार संघातील उमेदवार जाहीर केलेत. राज्यात भाजप 155 ते 160 च्या दरम्यान जागा लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी किमान 55 ते 60 उमेदवारांची नावे जाहीर होण्याची बाकी आहे. भाजपाची (BJP) उमेदवारी जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत भाजपाचे जवळपास 25 ते 30 विद्यमान आमदार आहेत. भाजप जवळपास 30 टक्के आमदारांची तिकीट कापणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे ज्यांची तिकीट निश्चित होती, त्या उमेदवारांची घोषणा भाजपने पहिल्या यादीत जाहीर केल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे भाजपचे जवळपास 26 आमदार सध्या वेटिंगवर यात विदर्भातील 10 आमदारांचा समावेश आहे. यातील दोन आमदार अकोला (Akola) जिल्ह्यातील आहे. 'वेटिंग'वर असलेल्या या आमदारांमध्ये भाजपचे अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे आणि मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांचा समावेश आहे 

भाजपाच्या पहिल्या यादीत 99 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले होते. याच यादीत अकोला पूर्व मतदारसंघातून पक्षाने तिसऱ्यांदा आमदार रणधीर सावरकर यांना संधी दिली आहे. मात्र, अकोला पूर्वची उमेदवारी जाहीर करतांना भाजपने अकोट, मुर्तीजापुर आणि अकोला पश्चिम या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघ भाजप शिवसेना शिंदे गटाला सोडण्याची शक्यता आहे. तर अकोला पश्चिम मतदार संघातील गेल्यावेळचे विजयी उमेदवार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्यामुळे त्या ठिकाणी भाजपला नवा उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांपैकी दोन आमदारांची आमदारकी सध्या पक्षाने 'ऑक्सिजन'वर ठेवली आहे. जनमानसात खालावलेली प्रतिमा, 'अँटी इन्कमब'न्सी मुळे असलेली आमदार विरोधी लाट आणि स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी यामुळे अकोट आणि मुर्तीजापुर मतदारसंघत भाजप नवे उमेदवार देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातही मूर्तिजापूर मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांपासून आमदार असलेल्या हरीश पिंपळे यांची उमेदवारी धोक्यात असल्याचे स्पष्ट संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत.

मुर्तिजापूर मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते 

भाजपाचे हरीश पिंपळे 1,910 मतांनी विजयी

उमेदवार                   पक्ष             मते 
हरिश पिंपळे             भाजप       59527
प्रतिभा अवचार          वंचित        57617
रविकुमार राठी          राष्ट्रवादी      41155

मुर्तिजापूर मतदारसंघातील एकुण मतदारसंख्या : 

स्त्री : 151121
पुरूष : 158629
तृतीयपंथी : 05
एकूण : 309755

मुर्तीजापुरमध्ये आमदार हरीश पिंपळेंची उमेदवारी 'डेंजर झोन'मध्ये : 

अकोला जिल्ह्यात उमेदवार बदलाची सर्वाधिक चर्चा आहे ती मुर्तीजापुर मतदारसंघाबद्दल. ऋतुजापुर हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. 2009 पासून सलग तीन टर्म आमदार हरीश पिंपळे या मतदारसंघात नेतृत्व करतात. मात्र 2019 च्या निवडणुकीत आमदार हरीश पिंपळे अगदी काठावर निवडून आले होते. शेवटच्या तीन-चार फेऱ्यांमध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रतिभा अवचार यांचा फक्त 1910 मतांनी पराभव केला होता. 2019 च्या निवडणुकीत मुर्तीजापुर आणि बार्शीटाकळी तालुक्यात अनेक गावांमध्ये हरीश पिंपळे यांना लोकांच्या रोशाचा सामना करावा लागला होता. मात्र त्याही परिस्थितीत आमदार हरीश पिंपळे यांनी काठावरचा मताधिक्य राखत मतदारसंघ तिसऱ्यांदा भाजपाच्या ताब्यात राखण्यात यश मिळवलं होतं. मात्र या निवडणुकीत चौथ्यांदा उमेदवारी मिळताना हरीश पिंपळे यांच्यासमोर अनेक आव्हान आहेत ती आव्हान पक्ष बाहेरच्या आव्हानांपेक्षा पक्षांतर्गत अधिक आहेत. हरीश पिंपळे यांची कार्यक्षेली त्यांच्या भोवतालची माणसं आणि यातच दुखावलेले कार्यकर्ते यामुळे त्यांना यावेळी उमेदवारी मिळण्यात अनेक अडचणी येणार असल्याची चिन्ह. अकोला आणि मुर्तीजापुर तालुक्यातील कधीकधी त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जाता त्यांच्याविरुद्ध बंड केला आहे. 

बार्शीटाकळी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी पुकारला होता आमदार पिंपळेंविरुद्ध 'एल्गार' : 

मुर्तीजापुरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्या विरोधात सध्या मतदारसंघातील पक्षाचेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उभे ठाकल्याचं चित्र आहे. ते 2009 पासून सातत्याने मुर्तीजापुरमधून भाजपचे आमदार आहेत. मात्र आता त्यांना चौथ्यांदा उमेदवारी नको म्हणून त्यांच्या विरोधात मतदारसंघातील पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटले आहेत. मुर्तिजापूर मतदारसंघात मुर्तिजापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यांचा समावेश आहे. मतदारसंघातील बार्शीटाकळी येथे हरीश पिंपळे यांच्या विरोधात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत हरीश पिंपळे यांना तिकीट देऊ नये अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे केलीये. आमदार पिंपळेंना दलालांनी घेरल्याचा गंभीर आरोप या कार्यकर्त्यांनी या बैठकीत केला‌ होता. मुर्तिजापूर येथेही असाच नाराज भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होण्याची शक्यता आहे. 

पक्षांतर्गत 'सर्व्हे'मध्ये आमदार पिंपळेना निगेटिव्ह मार्किंग : 

लोकसभा निवडणुकीपूर्वी वर्षभरापासून भाजप आपल्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये सातत्याने वेगवेगळे 'सर्व्हे' करतायेत.‌ पक्षाच्या अनेक 'सर्व्हे'मध्ये हरीश पिंपळे यांच्या कामाबद्दल नकारात्मक 'रिपोर्ट' आल्याची माहिती वारंवार समोर आली आहे. विधानसभा अधिवेशन काळात पक्षाकडून आमदारांना दिलेल्या 'रिपोर्ट कार्ड'मध्येही आमदार हरीश पिंपळे यांना कामगिरी सुधारण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही सकारात्मक बदल घडून आले नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.  लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांना आठ हजारांवर मतांची आघाडी आहे. धोत्रे कुटुंबीयांचा या मतदारसंघाशी धोत्रे कौटुंबिक जिव्हाळा आहे. कारण खासदार अनुप धोत्रेंचे वडील आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे 1999 मध्ये सर्वात पहिल्यांदा याच मतदारसंघावरून विधानसभेवर निवडून गेले होते. त्याच ऋणानुबंधामुळे या मतदारसंघात अनुप धोत्रेमाजींना आघाडी मिळाल्याची भावना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

भाजपमध्ये मुर्तीजापुरसाठी या नावांची आहे चर्चा :

 मतदारसंघात पिंपळे यांच्याशिवाय भाजपचे मातंग समाजाचे नेते आणि लहूशक्तीचे अध्यक्ष परिमल कांबळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे, पंकज सावळे, संघपरिवारातील मनोहर हरणे, राजश्री बोलके यांच्या नावाची चर्चा आहे. 

अकोट : 

अकोला जिल्ह्यातील भाजपसाठी 'डेंजर झोन'मध्ये असलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे अकोट मतदारसंघ. राज्यात पहिल्या यादीत समावेश नसलेल्या आमदाराच्या मतदारसंघांमध्ये अकोट मतदार संघाचाही समावेश आहे. गेल्या दोन टर्मपासून या मतदारसंघातून भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी झालेत. प्रकाश भारसाकळे हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे आहेत. त्यांनी याआधी दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे पाचवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. 2009 मध्ये आपला मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळवला. 2009 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून 35000 मतं प्रकाश भारसाकळे यांनी घेतली होती.. 2014 च्या निवडणुकीआधी त्यांनी भाजपात प्रवेश घेत 2014 आणि 2019 च्या दोन्ही निवडणुकीत पक्षाकडून विधानसभेत विजयश्री खेचून आणली. मात्र या निवडणुकीत स्थानिक उमेदवारी या मुद्द्यावर मतदारसंघात भारसाकळे यांच्या विरोधात वातावरण आहे हे दाखविण्याचा प्रयत्न इतर राजकीय पक्षांकडून होत आहे. यासोबतच वाढलेलं वय आणि भारसाकळे यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी या मुद्द्यावरूनही त्यांना उमेदवारी देऊ नये, असा आग्रह त्यांच्याच पक्षातील इतर इच्छुक करताना दिसून येत आहेत.

स्थानिक आमदाराचा मुद्दा अकोटच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी : 

गेल्या दहा वर्षापासून आमदार प्रकाश भारसाकळे या मतदारसंघाचं नेतृत्व करतायेत. मात्र, यावेळी 'स्थानिक'च्या मुद्द्यावरून त्यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न त्यांचे विरोधक आणि पक्षांतर्गत विरोधक करतायेत. कारण अनेक पक्षातील मतदारसंघाबाहेरचे इच्छुक अकोटमधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे अकोट मधून कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार स्थानिकच असला पाहिजे असा येथील राजकीय कार्यकर्ते, पदाधिकाऱी आणि जनतेचा आग्रह आहे.

अकोट विधानसभा मतदारसंघ... अकोला जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावणारा मतदारसंघ... या मतदारसंघात अकोट आणि तेल्हारा या दोन तालुक्यांचा समावेश होतोय. या मतदारसंघात तब्बल 3 लाख 10 हजार 88 मतदार आहेयेत.  अकोला जिल्ह्यातील 'अकोट विधानसभा मतदारसंघ आपल्या एका 'खास' वैशिष्ट्यासाठी. या मतदारसंघात एकदा निवडून आलेला 'आमदार' परत दुसऱ्यांदा निवडून येत नाही. या मतदारसंघानं 1985 पासून आपला हा अलिखित नियम अगदी कसोशीनं पाळला आहे. मात्र, 2014 आणि 2019 असे सलग दोनदा भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी झाले आहेत. 2014 पर्यंत युतीमध्ये शिवसेनेच्या ताब्यात हा मतदारसंघ होता. 2009 मध्ये येथून शिवसेनेचे संजय गावंडे विजयी झाले होते. मात्र, 2014 मध्ये युती तुटली आणि हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला. या मतदारसंघात मराठा आणि कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्याखालोखाल दलित आणि मुस्लिम समाजाचा मतदार येथे आहेय. यासोबतच बारी, भोई, धनगर, आदिवासी, माळी, कोळी आणि इतर छोटे समाज या मतदारसंघात आहेयेत. लोकसभेत येथून भाजपला 9168 हजार मतांची आघाडी आहेय.

अकोट मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते 

भाजपाचे प्रकाश भारसाकळे 7,260 मतांनी विजयी 

उमेदवार                   पक्ष             मते 
प्रकाश भारसाकळे      भाजप       48586
संतोष रहाटे                वंचित        41326
अनिल गावंडे              अपक्ष         28183

अकोट मतदारसंघातील एकूण मतदार संख्या :

स्त्री : 149214
पुरूष : 160873
तृतीयपंंथी :01
एकूण : 310088

भाजपकडून या नावांची आहे चर्चा : 

 येथील स्थानिक आमदाराच्या विरोधात जनता आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी भाजपच्या चिंतेत भर टाकणारी आहे. भाजपकडून विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांनी परत रिंगणात उतरण्याबद्दल मोठी साशंकता आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात ही जागा 'रेड झोन'मध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. उमेदवार बदलायचा निर्णय झाल्यास उमेदवारीच्या रांगेत भाजपाचे अनेक नेते आहेत. संजय धोत्रे येथून त्यांचे जवळचे नातेवाईक असणाऱ्या डॉ. रणजित सपकाळ यांचं नाव समोर करण्याची दाट शक्यता आहे. भाजपाच्या इतर प्रमुख दावेदारांमध्ये अकोटचे माजी नगराध्यक्ष पुरूषोत्तम चौखंडे, माजी शहराध्यक्ष कनक कोटक, माझी लष्करी अधिकारी कॅप्टन सुनील डोबाळे, तेल्हाऱ्याच्या माजी नगराध्यक्षा जयश्री पुंडकर, राजेश नागमते यांची नावे चर्चेत आहेत. 

भाजपाच्या मतदारसंघावर मित्र पक्षांचा डोळा : 

भाजपच्या ताब्यात असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघावरून महायुतीतल्या तिन्ही पक्षात कलगीतुरा रंगला. या मतदारसंघातून लढण्याची इच्छा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केलीये.‌ तर शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांनीही अकोटमधून उमेदवारीसाठी शड्डू ठोकला आहे. पहिल्या यादीत मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाला नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आता या मतदारसंघासाठी जोरदार चाचपणी सुरू केली आहे. पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी यासंदर्भात आमदार अमोल मिटकरी यांना तातडीने मुंबईला पाचारण केल्याने अकोटसंदर्भातला 'सस्पेन्स' आणखी वाढवला आहे. अकोट आणि मूर्तीच्यापुर मतदारसंघाबद्दल सुरू असलेल्या चर्चा... त्यातच या दोन्ही मतदारसंघात भाजप खरंच भाकरी फिरवणार का?, भाकरी फिरवली आणि नाही फिरवली तरी याचे पडसाद या दोन्ही मतदारसंघाच्या राजकारणात कसे पडणार?, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget