Shivsena Assembly Election List : शिवसेनेच्या पहिल्या यादीत 45 नावं, आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 45 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेना पक्षाकडून पहिल्या यादीत 45 जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 45 नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदेंनी माहीममधून सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेली उमेदवारांच्या नावांचं विश्लेषण केलं असता विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे सेनेच्या ज्या नेत्यांना यापूर्वी संधी दिली नव्हती त्यांना संधी देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. सेना नेत्यांच्या कुटुंबीयांना देखील संधी देण्यात आली आहे. एरंडोल, दर्यापूर, पैठण, जोगेश्वरी पूर्व, राजापूर आणि खानापूरमध्ये सेनेतील नेत्यांच्या कुटुंबीयांना संधी देण्यात आली आहे. सेनेतील नेत्यांची मुलं, भाऊ आणि पत्नी यांना उमेदवारी दिली गेल्याचं पाहायला मिळालं.
नेत्यांची मुलं रिंगणात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जळगावातील एरंडोल मतदारसंघातून विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांना संधी देण्यात आलेली नाही. त्यांच्याऐवजी अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आनंदराव अडसूळ हे सेनेचे माजी खासदार आहेत. दर्यापूरच्या जागेवर भाजपच्या नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा असतानाच सेनेतून अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
नेते खासदार बनले, कुटुंबीय आमदारकीच्या रिंगणात
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी दोन जण खासदार झाले होते. यामध्ये संदिपान भुमरे हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते. आता त्यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघात मुलगा विलास भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबईत खासदार रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघावर देखील सेनेनं उमेदवाराचं नाव जाहीर करुन हा मतदारसंघ देखील मित्रपक्षांकडे जाण्यापासून वाचवला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जोगेश्वरी पूर्व या जागेवर दावा सांगितला होता. खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना उमेदवारी जोगेश्वरी पूर्वमधून जाहीर करण्यात आली आहे.
आमदारांचे भाऊ रिंगणात
मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीतून उमेदवारी दिलीय, तर किरण सामंत यांना राजापूर मधून उमेदवारी देण्यात आली आहे. राजापूरमध्ये किरण सामंत यांच्या पुढं ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन साळवी रिंगणात असतील.
दरम्यान,सेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचा मुलगा सुहास बाबरला खानापूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
इतर बातम्या :