एक्स्प्लोर

कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत मिळणार; काय आहेत नियम आणि अटी?

कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य सरकारने त्या संदर्भातील जीआर काढला आहे.

मुंबई : कोरोना (Covid 19)  मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पन्नास हजारांची मदत जाहीर केली आहे. या संदर्भातील जीआर आज राज्य सरकारनं जारी केला आहे. मृतांच्या नाकेवाईकांना 50 हजारांचं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही मदत केली जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी असे निर्देश दिले होते. अखेर त्यानंतर राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे. 

कोणाला मिळणार मदत?

  • राज्यात जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास  50,000 रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार आहे.
  • कोरोनामुळे  व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात Clinical diagnosis च्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला  समजण्यात येईल. जरी हा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोरोनाचे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरीही ही मदत देणार आहे.
  • कोरोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल, जरी मृत्यू 30 दिवसाच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल.
  • जी व्यक्ती कोरोनामुळे बरी झालेली नव्हती, अशा प्रकरणातील व्यक्तीचा मृत्यू रुग्णालयात किंवा घरामध्ये झालेला आहे. त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणी जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 च्या कलम 10 खाली Medical Certificate of Cause of Death (MCCD) हे Form 4 व 4 A मध्ये नोंदणी प्राधिकाऱ्याला निर्गमित केले आहे अशा व्यक्तीचा मृत्यू कोरोनाचा मृत्यू समजण्यात येईल.
  • Medical Certificate and of Cause of Death (MCCD) मध्ये “कोव्हिड- 19 मुळे मृत्यू" याप्रमाणे नोंद नसली तरीही  अटीची पूर्तता होत असल्यास, ती प्रकरणे  50,000 रुपये मदत देण्यात येईल. 
  • नातेवाईकांना ही मदत मिळवण्यासाठी राज्य सरकारने विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • हा अर्ज दाखल करताना अर्जदाराने  स्वतःचा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक,  अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील,  मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम,  मृत्यू प्रमाणपत्र, इतर  नातेवाईकाचे नाहरकत असल्याचे स्वयं घोषणापत्र देणे आवश्यक आहे.
  • मृत पावलेल्या व्यक्तीचा आधार तपशील किंवा आधार नोंदणी क्रमांक, उपलब्ध असल्यास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या राज्यातील डेटा उपलब्ध असलेल्या आधार क्रमांकाशी मृत व्यक्तीचा आधार क्रमांक जुळल्यास हा अर्ज संगणकीय प्रणालीवर आपोआप  स्वीकृत करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
  • जर उपलब्ध आधार क्रमांकाशी जुळला नाही तर अशा अर्जदाराकडे Medical Certificate of cause of Death (MCCD) प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास ते तपासणीसाठी संबंधित जिल्हा शल्य चिकीत्सक मुख्य आरोग्य अधिकारी निश्चित करतील अशा वैद्यकीय अधिकाऱ्याकडे संगणकीय प्रणालीवर पाठविण्यात येईल. हे वैद्यकीय अधिकारी हे प्रमाणपत्र तपासून त्यात कोव्हिड-19  हे मृत्यूचे कारण त्यात नमूद असल्यास त्यास संगणकीय प्रणालीवर सहाय्य मिळणेबाबतचा हा अर्ज स्वीकृत करतील.
  • मृत व्यक्तीच्या RT-PCR/ Molecular Tests/RAT Positive अहवाल अथवा रुग्णालयात दाखल असताना करण्यात आलेल्या आरोग्य चाचण्यांच्या अहवाल तसेच इतर कोणतीही कागदपत्रे जी अर्जदाराच्या मते हा मृत्यू  कोरोनामुळे असल्याचा सिध्द करत असेल ती अर्जदार संगणकीय प्रणालीवर upload करतील. अर्जदाराने उपलब्ध करुन दिलेली कागदपत्रे संबंधित जिल्हा शल्य चिकीत्सक मार्फत / म.न.पा. क्षेत्रातील मुख्य आरोग्य अधिकारी यांचे कडील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याकडे संगणकीय प्रणालीवर पाठविण्यात येतील. वैद्यकीय अधिकाऱ्याने ही प्रमाणपत्रे तपासुन हा मृत्यू कोरोनामुळे असल्याचे मान्य केल्यानंतर अर्जदाराचा अर्ज  स्वीकारण्यात येणार आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sahyadri Guest House : आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
Kolhapur News : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी: उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन, काँग्रेसच्या माजी मंत्र्याची BDO ला शिवीगाळ
पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन, काँग्रेसच्या माजी मंत्र्याची BDO ला शिवीगाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Doctor on Pune Helicopter Crash : हेलिकॉप्टर कोसळं! घटनास्थळी पोहोचलेल्या डॉक्टरांनी काय पाहिलं?Pune Helicopter Crash Details : टेकऑफनंतर 5व्या मिनिटाला कोसळलं हेलिकॉप्टर, A टू Z माहितीABP Majha Headlines 9 AM : सकाळच्या 9 हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaPune Helicopter Crash Details : हेलिकॉप्टरचा चेंदामेंदा, दोन पायलट मृत्यूमुखी; EXCLUSIVE VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sahyadri Guest House : आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
आजारी लेकरांना घेत पालक थेट सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ; मुलांना फुटपाथवर ठेवत पालकांचे आंदोलन
Kolhapur News : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जमीन काढून घेतल्याचा समरजित घाटगेंवर आरोप, परत न दिल्यास कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी: उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्रात भाजपचा लिफाफा पॅटर्न, कोणत्या आमदारांना डच्चू मिळणार?
पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन, काँग्रेसच्या माजी मंत्र्याची BDO ला शिवीगाळ
पंचायत समितीला जाळ लावून तुम्हाला आत टाकेन, काँग्रेसच्या माजी मंत्र्याची BDO ला शिवीगाळ
Surya Grahan 2024 : आज सर्वपित्री अमावस्या; आजच्या दिवशी अजिबात करू नका 'या' चुका, घरावर कोसळेल संकटांचा डोंगर
आज सर्वपित्री अमावस्या; आजच्या दिवशी अजिबात करू नका 'या' चुका, घरावर कोसळेल संकटांचा डोंगर
Karnataka CM Siddaramaiah : ईडीच्या एन्ट्रीनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या भलत्याच पेचात अडकले, म्हणाले, पत्नीच्या त्या निर्णयाने हैराण!
ईडीच्या एन्ट्रीनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या भलत्याच पेचात अडकले, म्हणाले, पत्नीच्या त्या निर्णयाने हैराण!
रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 जणांना पाडणार, उमेदवारांची यादी तयार, लक्ष्मण हाकेंचा इशारा
रोहित पवार, राजेश टोपेंसह 50 जणांना पाडणार, उमेदवारांची यादी तयार, लक्ष्मण हाकेंचा इशारा
चला शिवस्मारक शोधायला, संभाजीराजे छत्रपतींच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची पहिली मोहीम, हेच का अच्छे दिन, भाजप सेनेला सवाल 
चला शिवस्मारक शोधायला,  संभाजीराजे छत्रपती यांच्या राजकीय पक्षाची पहिली मोहीम, भाजप सेनेला थेट सवाल
Embed widget