एक्स्प्लोर
Advertisement
मुख्यमंत्र्यांचं कोसळलेलं हेलिकॉप्टर कोणत्या बनावटीचं?
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये उड्डाणानंतर मिनिटभराच्या आतच कोसळलं. सुदैवाने या अपघातातून मुख्यमंत्री बचावले असून हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुरक्षित आहेत. या अपघातामागील तांत्रिक कारणांचा शोध हवाई वाहतूक तज्ज्ञ घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुख्यमंत्र्यांचं कोसळलेलं हेलिकॉप्टर कोणत्या बनावटीचं?
मुख्यमंत्र्यांनी उड्डाण केलेलं हेलिकॉप्टर हे सिरकॉस्की (sirkowski) व्हीटी या प्रकाराचं आहे. जगभरातील व्हीव्हीआयपींना हे हेलिकॉप्टर वापरलं जातं. देशात उपलब्ध असलेल्या हेलिकॉप्टरपैकी हे सर्वोत्कृष्ट आहे.
हे हेलिकॉप्टर जेमतेम तीन ते चार वर्ष जुनं आहे. या हेलिकॉप्टरने एकावेळी अडीच तासांचा म्हणजे साधारणपणे 800 किलोमीटरचा प्रवास करता येतो. दोन पायलट आणि पाच प्रवासी वाहून नेण्याची या हेलिकॉप्टरची क्षमता आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला कुशल पायलट
महाराष्ट्र सरकारचे अनुभवी क्रू हेलिकॉप्टर उडवतात. टेक्निकल इमर्जन्सी हँडल करण्याचं प्रशिक्षण त्यांना दिलेलं असतं. किमान तीन हजार तास उड्डाणाचा अनुभव असलेले पायलट यासाठी नियुक्त केले जातात. कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल यांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना अशी हेलिकॉप्टर आणि पायलट दिले जातात.
कसा झाला अपघात?
मुख्यमंत्री लातूरमधील निलंग्याहून मुंबईला येताना हा अपघात झाला. शिवाजी विद्यालय शाळेच्या मैदानातून उड्डाणानंतर 50 फुटांवर असताना, एका मिनिटाच्या आतच हेलिकॉप्टर कोसळलं. चॉपर फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
हेलिकॉप्टरचा पंखा विजेच्या खांबाला धडकला. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे मोठा अपघात टळला.
यानंतर सगळीकडे धुरळा उडाला आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. दुर्घटनेनंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.
हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण?
अपघातावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, केतन पाठक, प्रधान सचिव प्रवीण परदेशी आणि दोन क्रू मेंबर हेलिकॉप्टरमध्ये होते. हे सर्व जण सुखरुप आहेत. मुख्यमंत्री अपघातानंतर लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरी गेले.
सगळ्यांच्या आशीर्वादाने सुखरुप : मुख्यमंत्री
“मी सध्या निलंग्यातच आहे, छोटासा अपघात झाला आहे. आम्हाला कोणाला काहीच झालेलं नाही. मला तर काहीच इजा झालेली नाही. डॉक्टरांनी तपासणी केली आहे. सुगर, ब्लड प्रेशर सगळं व्यवस्थित आहे. ईश्वराची कृपा आणि महाराष्ट्रातील 11 कोटी 20 लाख लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मी सुखरुप आहे.काळजी करण्याचं कारण नाही,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर एबीपी माझाशी बोलताना दिली.
नागरी हवाई उड्डाण संचालनालयची माहिती
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरने दुपारी 12 वाजता उड्डाण केलं. पण वाऱ्याचा बदलता दाब लक्षात आल्याने वैमानिकाने लॅण्डिंग करण्याचं ठरवलं. या दरम्यान, हेलिकॉप्टर वायरमध्ये अडकलं. यामुळे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. चॉपरमधील सर्व सहा जण सुखरुप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, अशी माहिती नागरी हवाई उड्डाण संचालनालयाने दिली.
संबंधित बातम्या :
PHOTO : देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement