(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar : महिना झालं तरी मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळेना, ते नेमके कशाला घाबरतात, अजित पवारांचा सवाल
एक महिना झाला तरी यांना मंत्रीमंडळाच्या विस्तार करण्यासाठी मुहूर्त मिळेना. का ग्रीन सिग्नल मिळत नाही, ते नेमके कशाला घाबरतात हेच आम्हाला कळेना असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
Ajit Pawar : एक महिना झाला तरी यांना मंत्रीमंडळाच्या विस्तार करण्यासाठी मुहूर्त मिळेना. का ग्रीन सिग्नल मिळत नाही, एकवाक्यता का होत नाही ते नेमके कशाला घाबरतात हेच आम्हाला कळेना असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. राज्यातील 13 कोटी जनता आशेने बघत आहे. अनेकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. सचिवांशी बोललो तर ते म्हणतात मंत्री महोदयांच्या रिमार्कची गरज आहे. त्यांचा रिमार्क असल्याशिवाय आम्ही काही करु शकत नाही. त्यामुळं आता कसा कारभार चाललाय ते जनतेन पाहावं असेही पवार यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी
पूरग्रस्त भागाचा दौरा करुन मी काही आमदारांसोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील भेटलो. पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही भागात गोगलगायीचे प्रमाण वाढलं आहे. काही शेतकरी आत्महत्या करण्यातपर्यंत पोहोचले आहेत. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. त्यामुळं तत्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे असे मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
ताबडतोब अधिवेशन बोलावले पाहिजे
राज्यकर्ते बदलत असतात. नवीन येत असतात जुने जात असतात. कोणीही सरकारमध्ये आलं तरी कायदा, संविधान नियम याच्या अधिन राहून काम केलं पाहिजे असेही अजित पवार यावेळी म्हणाले. अतिवृष्टीनं शेतीचं, घराचं, रस्त्याचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी असे अजित पवार म्हणाले. ताबडतोब अधिवेशन बोलावले पाहिजे. कारण दरवर्षी पावसाळी अधिवेशन हे जुलै महिन्यात घेतलं जातं. आता ऑगस्ट महिना सुरु झाला असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले. एक महिना झाला तरी मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नसल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.
राज्यातल पूरग्रस्त भागात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच काही ठिकाणी गोगलगायीचा प्रादुर्भाव होत आहे. पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. काही ठिकाणी मनुष्यहानी देखील झाली आहे. घरे, रस्ते, यांचे देखील नुकसान झालं आहे. पुलांचे नुकसान झाले आहे. त्यामुलं नुकान झालेल्या शेतकऱ्यांना, नागरिकांना आधार देण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
- Eknath Shinde Cabinet Expansion : शिंदे सरकारचा उद्या होणारा राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर, सूत्रांची माहिती
- महाविकास आघाडी सरकारचे काही निर्णय धडाधड रद्द का केले? शिंदे-फडणवीस सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश