एक्स्प्लोर
अजित पवार यांना पूर्णपणे क्लीन चिट मिळालेली नाही : गिरीश महाजन
एक दोन प्रकरणात नागपूर खंडपीठात एसीबीने कागदपत्र सादर केली असली तरी अजून बऱ्याच प्रकरणात चौकशी होवू शकते असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांच्या काळात अजित पवार यांच्या मदतीने मुख्यमंत्री पद घेतले असले तरी त्यांनी क्लीन चिट दिली नसल्याने महाजन यांनी सांगितले आहे.
मुंबई : अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणात क्लीन चिट देण्यात आलेली नसून त्यांची हजारो प्रकरणात चौकशी होणार असल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. एक दोन प्रकरणात नागपूर खंडपीठात एसीबीने कागदपत्र सादर केली असली तरी अजून बऱ्याच प्रकरणात चौकशी होवू शकते असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन दिवसांच्या काळात अजित पवार यांच्या मदतीने मुख्यमंत्री पद घेतले असले तरी त्यांनी क्लीन चिट दिली नसल्याने महाजन यांनी सांगितले आहे.
मुलगी रोहिणी खडसे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव पक्षातल्या नेत्यांनीच केल्याचा एकनाथ खडसेंचा दावा आहे. आणि त्या नेत्यांविरोधात पुरावे देण्यावरुन गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये कसा कलगीतुरा रंगला आहे. दरम्यान एकनाथ खडसेंकडून भाजपा प्रदेश अध्यक्षांकडे पुरावे सादर केले असल्याच्या प्रश्नावर मात्र गिरीश महाजन यांनी उत्तर देण्याचे टाळत नो कमेंट्स केले.
माजी जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना दुसरा मोठा दिलासा मिळालाय. नागपूर पाठोपाठ अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलली आहे. अमरावतीच्या पोलिस अधीक्षकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केल आहे. त्यात कायदेशीर बाबी तपासण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे या प्रकरणात अजित पवारांना जबाबदार धरता येणार नाही, असं नमूद करण्यात आलं आहे.
माजी जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना दुसरा मोठा दिलासा मिळाला आहे. नागपूर पाठोपाठ अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली आहे. घोटाळ्याचं खापर अधिकाऱ्यांवर फोडण्यात आलं आहे. त्यामुळं घोटाळ्याचे 72 हजार कोटी कुणाच्या खिशात गेले हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement