एक्स्प्लोर
नगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी एमआयडीसीच्या पाईपलाईनला भगदाड
![नगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी एमआयडीसीच्या पाईपलाईनला भगदाड Ahmednagar Water Pipeline In Midc Burst On Second Day नगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी एमआयडीसीच्या पाईपलाईनला भगदाड](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/18155218/ahm-railway-track-pipeline-brus-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : मुळा धरणातून अहमदनगरात एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी आज पुन्हा फुटली. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे.
देहरे जवळ आज पुन्हा मुख्य जलवाहिनी फुटली. मनमाड महमार्गाजवळ पाण्याची जलवाहिनी फुटल्याने वाहतूक विस्कळीत झालीच, शिवाय लाखो लीटर पाणी वाया गेलं. सकाळी अकरा वाजता जलवाहिनीला भगदाड पडलं.
कालही नगरमधल्या मुळा धरणातून एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन देहरे गावाजवळ फुटली. वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह एवढा जोरात होता की रेल्वे ट्रॅकखालची वाळूही वाहून गेली. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला.
जूनच्या महिना निम्मा संपला आहे, तरी पावसानं अद्याप पाठ फिरवल्यानं नगर जिल्हा भीषण दुष्काळाला तोंड देत आहे. त्यात सलग दुसऱ्या दिवशी पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय. त्यामुळे दुष्काळाचं संकट अधिक गडद होत चाललं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)