एक्स्प्लोर
सख्खा भाऊ पक्का वैरी, जमिनीच्या वादातून भावाला जाळून मारण्याचा प्रयत्न
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आरोपी शरद भदे आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल त्यांना अटक करण्यात आली आहे.
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याचं पाहायला मिळालं. जमिनीच्या वादातून आरोपीने त्याच्या सख्ख्या भावाला आणि वहिनीला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पती-पत्नी दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव इथे आज (28 ऑगस्ट) सकाळी ही घटना घडली आहे. आरोपी शरद भदे आणि त्याचा सख्खा भाऊ गोरख भदे यांच्या गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या विषयावरुन वाद सुरु होता. हा एवढा टोकाला गेला की आरोपीने भावाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. आज सकाळी गोरख भदे आणि त्याची पत्नी सुरेखा भदे आपल्या छापराच्या घरात झोपलेले असताना, शरद आणि त्याच्या पत्नीने बाहेरुन घराची कडी लावली आणि छप्पर पेटवून दोघांनाही जाळण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत गोरख भदे आणि त्याची पत्नी सुरेखा भदे गंभीर भाजले असून त्यांना उपचारांसाठी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आरोपी शरद भदे आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे श्रीगोंदा तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
राजकारण
राजकारण
Advertisement