एक्स्प्लोर
छिंदमचं वकीलपत्र स्वीकारल्याची अफवा, वकिलाला नाहक मनस्ताप
शिवराय हे माझं दैवत आहे. त्यामुळं मी छिंदमचं वकीलपत्र घेतलं नाही आणि घेणार नसल्याचं सोरटे यांनी स्पष्ट केलं आहे.
अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम प्रकरणाचा फटका वकिलाला बसला आहे. छिंदमचं वकीलपत्र घेतल्याची खोटी पोस्ट फिरल्यानं वकिलाला मनस्ताप सहन करावा लागतो आहे. अॅड. सुरेश सोरटे यांच्या मोबाईल क्रमांकासह पोस्ट फिरल्यानं ते त्रस्त झाले आहेत. फोनवरील शिवीगाळ आणि धमकीनं त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या आणि भाजपमधून हकालपट्टी केलेल्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव बार असोसिएशननं केला आहे. मात्र सोरटे यांनी छिंदमचं वकीलपत्र घेतल्याची खोटी पोस्ट व्हायरल झाल्याने सोरटेंकडे विचारणा होत आहे.
रविवारी सकाळपासून सोरटेंना मोबाईलवरुन शिवीगाळ आणि दमबाजी केली जाते आहे. नगरसह सातारा, नाशिक, पुण्यातून फोन आले आहेत. मेसेज आणि सततच्या फोननं सोरटे व्यथित झाले आहेत.
या प्रकरणी सोरटे यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांना निवेदन दिलं आहे. खोटी पोस्ट पसरणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे माझं दैवत आहेत. त्यामुळे मी छिंदमचं वकीलपत्र घेतलं नाही आणि घेणारही नाही, असे सोरटे यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी पोलीस प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन, सोरटे यांना शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त दिला आहे.
संबंधित बातम्या :
नगर पोलिसांचा चकवा, छिंदमला येरवाड्याला सांगून नाशिक जेलमध्ये नेले!
शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, माफी मागतो, प्रायश्चित्तास तयार : छिंदम
शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्याला महाराष्ट्रातून हद्दपार करा : संभाजीराजे
श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत
नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement