महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन
लॉकडाऊन उठल्यानंतर एक ऑगस्टपासून द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या अध्यापनास सुरुवात करावी असे या आदेशात स्पष्टपणे सांगण्यात आला आहे. मागील वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आश्वासीत प्रवेश दिला जाईल.
मुंबई : राज्यातील कोरोना या विषाणूंचा संसर्ग वाढत असून भविष्यात त्यात सुधारणा होण्याची आशा आहे. मात्र तरीही राज्यातील काही भागातून हद्दपार होईल याची खात्री देता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात न बोलावता ऑनलाइन प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून द्या असे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांनी राज्याच्या सर्व विद्यापीठांना पाठवला आहे
लॉकडाऊन उठल्यानंतर एक ऑगस्टपासून द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या अध्यापनास सुरुवात करावी असे या आदेशात स्पष्टपणे सांगण्यात आला आहे. मागील वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आश्वासीत प्रवेश दिला जाईल. गैरहजर आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा बरोबर महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. अंतिम वर्षाचे विद्यार्थी वगळता सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्षात तथा सत्रात प्रवेश घेण्यासाठी पात्र समजून प्रवेश दिला जाणार आहे. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच महाविद्यालयीन स्तरावर होईल.
प्रवेश अर्ज महाविद्यालयांनी आपापल्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करावा
लॉकडाऊन उठल्यानंतर विद्यार्थी अध्यापनात झाल्यानंतर मूळ कागदपत्रे पडताळून विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करावा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर सर्व महाविद्यालयांना विद्यार्थी पालक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी नियमांचं पालन करणे बंधनकारक आहे. मास्क सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला. स्वच्छतागृहांमध्ये पुरेशा सोयी सुविधा करून नियमित स्वच्छता करावी.
संबंधित बातम्या :
सीमा भागातील मराठी विद्यार्थ्यांसाठी नवीन शासकीय मराठी महाविद्यालय सुरू होणार
Mumbai University | विद्यार्थ्यांना हफ्त्यांमध्ये फी भरण्याची सवलत द्या, मुंबई विद्यापीठाकडून आदेश