स्मार्ट बुलेटिन | 06 डिसेंबर 2020 | रविवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन, कोरोना संकटामुळे चैत्यभूमी परिसरात येण्यास अनुयायांना मज्जाव
2. शेतकऱ्यांची केंद्र सरकारसोबतची बैठक तोडग्याविनाच, आता 9 तारखेला शेतकऱ्यांची सरकारसोबत चर्चा, सरकारनं लेखी निर्णय देण्याची शेतकऱ्यांची मागणी
3. मराठा आरक्षणाबाबत 9 तारखेला पाच सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी, आरक्षण स्थगितीचा निर्णय दिलेल्या तीन न्यायमूर्तींचा खंडपीठात समावेश
4. राज्यात रक्ताचा तीव्र तुटवडा, मुख्यमंत्र्यांकडून रक्तदान करण्याचं आवाहन, काँग्रेसकडूनही राज्यव्यापी रक्तदान अभियान
5. मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही; काँग्रेस नेते, मंत्री विजय वडेट्टीवार यांचा इशारा
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 06 डिसेंबर 2020 | रविवार | ABP Majha
6. रशियात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात, डॉक्टर आणि आरोग्यसेवकांना लसीचा पहिला डोस, लसीकरणाला सुरुवात करणारा रशिया जगातील पहिला देश
7. सीरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावाला 'एशियन ऑफ द ईयर', कोरोना महामारीचा सामना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका
8. 2030 पर्यंत मुंबईकरांचा प्रवास सिग्नल प्री होण्याची शक्यता, ट्रान्स हार्बर लिंक रोड प्रकल्पावर 'एबीपी माझा'चा स्पेशल रिपोर्ट
9. 'नो मराठी, नो अॅमेझॉन', अॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करा, अॅमेझॉनकडे मनसेची मागणी; मनसेच्या मागणीविरोधात अॅमेझॉन कोर्टात
10. भारत आणि ऑस्ट्रेलियात आज दुसरा टी20 सामना; टीम इंडियाला विजय मिळवून मालिका खिशात घालण्याची संधी, तर टीम ऑस्ट्रेलियातील खेळाडूंच्या दुखापतीचं सत्र सुरुच