एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 4 सप्टेंबर 2020 | शुक्रवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या लेखी परीक्षा, मंत्री उदय सामंत यांची माहिती, 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर होणार 2. ड्रग्ज प्रकरणी मुंबईत एनसीबीचं धाडसत्र, एकाचवेळी रिया, शौविक आणि सॅम्युअल मिरांडाच्या घरी धडक, दिल्लीहून आलेल्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात तपास सुरु 3. मुंबई आहे की, पाकव्याप्त काश्मिर, अभिनेत्री कंगना रणौतचं ट्वीट, संजय राऊत यांनी धमकी दिल्याचाही आरोप, हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतून कंगनाच्या ट्वीटचा निषेध 4. मराठा आरक्षण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण, न्यायालयाकडून निकाल निकाल राखून ठेवला, प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवण्याची मागणी 5. भारतीय सैन्यानं तयार राहावं सीडीएस बिपीन रावत यांच्या सूचना, लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या लडाख दौऱ्याचा आज दुसरा दिवस पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 4 सप्टेंबर 2020 | शुक्रवार | ABP Majha 6. मुंबईतील लोकल सुरु करण्यापूर्वी कार्यालयाच्या वेळा बदला, प्रवासी संघाचा मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार, मागणी मान्य न झाल्यास घंटानाद आंदोलनाचा इशारा 7. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल नागपूर दौऱ्यावर, उपराजधानीत कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी मुंबई पॅटर्न राबवणार 8. पुण्यातील ढिम्म आरोग्य यंत्रणेवरून शरद पवार यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले, मुख्यमंत्र्यांकडूनही पुण्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा 9. गंभीर अवस्थेतील रुग्ण महिलेला चक्क हातगाडीवर नेण्याची वेळ, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील प्रकार, आरोग्य यंत्रणेतील भोंगळ कारभार चव्हाट्यावर 10. ठाण्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढली, मिशन बिगीन अगेनचा गैरफायदा, नियमात शिथिलता दिल्याने नागरिक बेफिकीर
आणखी वाचा























