एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 3 मे 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- देशात लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवला, शाळा, मॉल्स, रेल्वे, चित्रपटगृह बंदच राहणार; ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात सूट
- महाराष्ट्रात काल 1008 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, एकट्या मुंबईत 751 रुग्ण; राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 11,506 वर
- कोरोनामुळे जगभरात एकूण 2 लाख 39 जणांचा मृत्यू, एकट्या अमेरिकेत 24 तासांत सर्वाधिक 1900 जणांचा मृत्यू
- लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थ्यांसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या; नाशिकमधील मजुरांना घेऊन ट्रेन भोपाळकडे रवाना
- राज्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये 4 मे पासून दारू विक्रीस परवानगी, अटी आणि शर्ती पाळाव्या लागणार; रेड झोनमध्ये निर्बंध कायम
- महाराष्ट्रात अंतर्गत प्रवास करण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन नियमावली; कंटेनमेंट झोन असलेल्या शहरात किंवा जिल्ह्यातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होणार नाही
- लॉकडाऊन किती दिवस वाढवणार? कोरोना असा संपणार नाही; एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं वक्तव्य
- डीएचएफएल आणि येस बँक गैरव्यवहार प्रकरणी वाधवान बंधूंचा जेलमधील मुक्काम वाढला; सीबीआय कोठडीत 8 मे पर्यंत वाढ
- राज्यातील विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा, उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा
- पुण्यात विविध भागात शनिवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शिवाजीनगर भागात गारांचा पाऊस झाल्याचीही माहिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement